Radhika Merchant Sister's Look: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. अंबानी कुटुंबाच्या आनंदात जगातील मोठ-मोठे सेलिब्रिटी उत्साहाने सहभागी होत आहेत. लग्नाच्या सर्व विधींमध्ये सेलिब्रिटींचे लूकही सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. अंबानी कुटुंबातील सर्व सदस्य स्वत: एकापेक्षा एक फॅशन गोल सेट करत आहेत. दरम्यान राधिका मर्चंटची बहीण अंजली मर्चंटचा लूक सुद्धा चांगलाच व्हायरल होत आहे. गृहशांती पूजेदरम्यान अंजलीचा साधा लूक पाहून इंटरनेटवर लोक तिचे कौतुक करत आहेत. अंजलीच्या या लूकवरुन तुम्हीही काही प्रेरणा घेऊ शकता. चला तर मग पाहूया तिच्या लूकच्या काही खास गोष्टी.
लग्नाआधी होणाऱ्या गृहशांती पूजेला अंजलीने अतिशय ट्रेडिशनल लूक कॅरी केला. तिने गुजरातची प्रसिद्ध घरचोडा साडी निवडली. मरून रंगाची सुंदर पारंपारिक डिझाइनची साडीत ती सुंदर दिसली. साडीच्या गोल्डन वर्क बॉर्डरने साडीला आणखीनच आकर्षक बनवले. अंजलीच्या लूकमध्ये सर्वात खास म्हणजे तिचा ब्लाऊज. गोल्डन कलर पीकॉक डिझाइन आणि हेवी भरतकाम असलेल्या या ब्लाउजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तुम्हीही एखाद्या लग्न किंवा समारंभाला जाण्याचा विचार करत असाल तर अंजलीच्या या लूकवरून इंस्पिरेशन घेऊ शकता. हेवी ब्लाऊजसोबत सिंपल साडी किंवा सुंदर हेवी बॉर्डर तुम्हाला ट्रेडिशनलसोबत ट्रेंडी लुक देईल.
अंजलीने आपला मेकअप अतिशय साधा आणि सटल ठेवला होता. डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी तिने विंग्ड आयलाइनर, हेवी मस्कारा, न्यूड आयशॅडोचा वापर केला. यासोबतच ग्लोइंग लुकसाठी तिने थोडं हायलाइटर, रोझ पिंक ब्लश आणि लव्हली लाइट पिंक ग्लॉसी लिपस्टिकने आपला मेकअप लूक पूर्ण केला. हेअरस्टाईलच्या बाबतीत तर तिने अगदी साधेसे स्लीक बन बनवले. तुम्ही सुद्धा अंजलीसारखा साधा आणि सिंपल लूक ट्राय करू शकता.
संपूर्ण लुक आणखी खुलवण्यात किंवा बिघडवण्याचं काम दागिने करतात. अंजलीच्या लुकमध्ये तिच्या दागिन्यांचाही मोठा वाटा होता. तिच्या सुंदर दागिन्यांमुळे तिचा एकंदरीत लूक अधिकच खास झाला. तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर चोकर सेट घातला आणि त्यासोबत हेवी एमराल्ड नेकलेसने लुक आकर्षक बनवले. यासोबतच मोठे स्टेटमेंट इयररिंग्सने तिचा पूर्ण लुक आणखी सुंदर बनवण्याचे काम केले. थोडं रॉयल दिसायचं असेल तर मांग टीका लावायला विसरू नका. अंजलीने स्टेटमेंट मांग टिका आणि एका छोट्या टिकलीने तिच्या संपूर्ण लुकला रॉयल बनवले.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या