Tips to Do Ganesh Visarjan at Home: दहा दिवस उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पााला निरोप दिला जातो. गणेशोत्सवाच्या काळात गणपतीची स्थापना केली जाते आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या मंडळांमध्ये आणि ज्या घरांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते, त्या घरांमध्ये खूप उत्साह असते. दहा दिवसांनंतर अनंत चतुर्दशीला गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी दीड, पाच किंवा सात दिवसांचा गणपती असतो. तर अनेक मंडळ आणि घरी दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाचे विसर्जन नदी, तलाव, कुंड यात केले जाते. पण पर्यावरणाचा विचार करून ते घरीच करणं चांगलं आहे. चांगली गोष्ट अशी आहे की आपण विसर्जनाचे पाणी घराच्या बागेत किंवा कुंडीमध्ये टाकू शकता. घरी विसर्जन कसे करावे हे जाणून घ्या
आपण घरी विसर्जन करण्यासाठी मोठ्या टबचा वापर करू शकता. बाप्पाची मूर्ती लहान असेल तर बादलीत ही विसर्जित करता येते. हवं असेल तर मुलांच्या स्विमिंग पूलचाही वापर करता येतो. आपण जे काही वापरत आहात ते नवीन किंवा शुद्ध आहे याची काळजी घ्या.
मातीच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणपतीचा आकार लक्षात घेऊन बादली किंवा टब घ्या. मग बादलीत इतकं पाणी घाला की गणपतीचं विसर्जन होईल. आपण ते फुलांनी किंवा तरंगत्या दिव्यांनी सजवू शकता. बाप्पाच्या विसर्जनानंतर २४ तासांत मूर्ती पूर्णपणे विरघळते. तुरटीच्या गणपतीचे देखील लोक अशा प्रकारे विसर्जन करू शकतात. ते पाण्यात विरघळायला जास्त वेळ लागणार नाही. काही लोक हे शुद्ध करण्यासाठी विसर्जनाच्या पाण्यात गंगा जल सुद्धा घालू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विसर्जनच्या टब किंवा बादलीच्या भोवती रांगोळी किंवा फुलांनी सजवू शकता.
गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर त्याचे पाणी इकडे तिकडे टाकू नका. आपण ते झाडांमध्ये किंवा कुंड्यांमध्ये टाकू शकता. याशिवाय हे पाणी बागेत वापरता येते.