Nita Ambani Look before Son's Wedding: मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाआधी नीता अंबानीचा आणखी एक लूक समोर आला आहे. ज्यात त्यांनी केसांमध्ये गजरा घालून नववधूसारख्या तयार झालेल्या दिसत आहेत. त्याचबरोबर साडीची विशेषता जाणून तुम्हालाही मोह होईल. नीता अंबानी यांची प्रत्येक साडी ट्रेडिशनल आणि मॉर्डनचा टच असल्याने खूप खास असते. बनारसी साडीपूर्वी त्या माता की चौकीमध्ये लाल रंगाची घरचोळा साडी नेसलेल्या दिसल्या आहेत. ज्यात त्या नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर आणि एलिगंट अतिशय दिसत होत्या.
सोनेरी बारीक झरीची बॉर्डर असलेल्या साडीवर अनेक रंगात काम केलेले आहे. हिरव्या, गुलाबी, जांभळ्या, केशरी रंगावर सोनेरी झरी बनवलेली आहे. मनीष मल्होत्रा कलेक्शनमधून घेतलेली ही खास साडी बनारसी सिल्क फॅब्रिकमध्ये तयार करण्यात आली आहे. ज्याला नीता अंबानी यांनी गोल्डन ब्लाऊजसोबत पेअर केले आहे. त्याचबरोबर ब्लाऊजच्या मागची डोरी रंगीबेरंगी धाग्यांनी सजवलेली आहेत.
नीता अंबानी यांनी लांब वेणी घालून त्यावर पांढऱ्या फुलांपासून बनवलेला गजरा लपेटलेला होता. मिसेस अंबानी यांनी हा लूक साधा ठेवण्यासाठी फक्त हिरव्या स्टोनपासून बनवलेल्या हेवी झुमक्यांसोबत पेअर केले आहे.
माताच्या चौकीच्या दिवशी नीता अंबानी यांनी लाल रंगाची घरचोळा साडी नेसली होती. ज्यावर संपूर्ण सोनेरी काम करण्यात आले होते. त्याचबरोबर गळ्यात घातलेला नवरत्न हार सुंदर दिसत होता. हिरवा, लाल आणि पांढऱ्या रत्नांनी बनवलेला चोकर नेकपीस एकदम हटके दिसत होता. जे नीता अंबानी यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी पुरेसे आहे.