Nita Ambani Lehenga Look: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा सुरू झाला आहे. पाहुण्यांचे आगमन सुरूच आहे. सारा अली खान, खुशी कपूर, इब्राहिम अली खान यांच्याव्यतिरिक्त मुकेश अंबानी यांनी जॉन सीनाचे स्वागत करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्याचवेळी शाही स्टाईलमध्ये तयार झालेल्या अंबानी कुटुंबीयांनी देखील पापराझींना पोज दिले आहे. पिंक पीच कलरच्या लेहंगामध्ये तयार झालेल्या नीता अंबानी यांच्या लेहंगाचे डिटेल्स समोर आले आहेत.
नीता अंबानी यांचा हा शाही लेहंगा डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केला आहे. यासोबतच या लेहंगाची संपूर्ण माहिती देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. पीच रंगाचा हा लेहेंगा सिल्क फॅब्रिकने तयार केला आहे. यावर पिस्ता ग्रीन, ब्लश पिंक आणि व्हिंटेज ब्रोज कलरच्या धाग्यांनी भरतकाम करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ब्लाऊजला नकासी आणि साध्या गोल्डसोबत सिल्व्हर जरदोसी वर्क केलेले आहे. तसेच हे ब्लाऊजमध्ये स्वारोस्की क्रिस्टल्स लावून तयार केले आहे.
स्वदेश अंतर्गत हा हँड क्राफ्टेड लेहेंगा तयार करण्यासाठी ४० दिवस लागले आहेत. त्याचबरोबर या घाघरा आणि चोलीसोबत पेस्टल रंगाचा ट्रेडिशनल रंगघाट दुपट्टा मॅच केला आहे.
नीता अंबानी यांनी या सुंदर पीच कलरच्या घाघराला हेवी वन पीस नेकलेस, मांगटिका आणि इयररिंग्ससोबत मॅच केले आहे. तर हातात ब्रेसलेट आणि मेहंदी मध्ये त्या नवरदेवाच्या आईच्या रुपात खूप सुंदर, रॉयल दिसत आहेत.