Anant Radhika : अंबानींच्या मुलाचा प्री-वेडिंग सोहळा संस्मरणीय ठरणार; पाहुण्यांसाठी आहे 'हा' ड्रेस कोड-anant ambani radhika merchant pre wedding celebration know the dress codes for the guests ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Anant Radhika : अंबानींच्या मुलाचा प्री-वेडिंग सोहळा संस्मरणीय ठरणार; पाहुण्यांसाठी आहे 'हा' ड्रेस कोड

Anant Radhika : अंबानींच्या मुलाचा प्री-वेडिंग सोहळा संस्मरणीय ठरणार; पाहुण्यांसाठी आहे 'हा' ड्रेस कोड

Feb 26, 2024 07:55 PM IST

Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding Festivities: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा २०२२ मध्ये साखरपुडा झाला. जुलैमध्ये हे कपल लग्न करणार आहे. मार्चमध्ये त्यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन

Guest Dress Code in Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding Celebration: अनंत अंबानी जुलैमध्ये राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहेत. १ ते ३ मार्च दरम्यान होणाऱ्या या कपलच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे निमंत्रण पाठवण्यात आली आहेत. यामध्ये अतिथींचा ड्रेस कोड आणि कार्यक्रमांची माहिती देणयात आली आहे. या प्री वेडिंग सेलिब्रेशनला उद्योगपती, गायक, अभिनेते आणि खेळाडूंसह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

"आम्ही आनंदाने आणि उत्साहाने भरलेल्या अंतःकरणाने तुम्हाला जामनगरमधील आमच्या घरी अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी आमंत्रित करतो. आमच्या आनंदात, प्रेमात आणि हास्यात सहभागी होण्यासाठी आणि आम्ही कायमस्वरूपी आठवणी निर्माण करण्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत असण्यास आम्ही उत्सुक आहोत," असे जगभरातील मान्यवरांना पाठवलेल्या डिजिटल निमंत्रणात म्हटले आहे, असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

आउटलेटनुसार तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या थीमचे फंक्शन्स असतील जे त्यांनी सुचवलेल्या ड्रेस कोडनुसार उपस्थित राहणे अपेक्षित आहे. या आमंत्रणाचा एक व्हिडिओही या आऊटलेटने ट्विट केला आहे.

मनीकंट्रोलनुसार, पहिल्या दिवसाचे नाव "अॅन इव्हनिंग इन एव्हरलँड" आहे जिथे ड्रेस कोड "एलिगेंट कॉकटेल" आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी प्रत्येकी दोन कार्यक्रम होतील.

'अ वॉक ऑन द वाइल्डसाइड' या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या कार्यक्रमासाठी पाहुणे जामनगरमधील अंबानी यांच्या प्राणी बचाव केंद्राला 'जंगल फिव्हर' ड्रेस कोडमध्ये भेट देणार आहेत. तर दुसऱ्या इव्हेंटसाठी पाहुणे 'डॅझलिंग देसी रोमान्स' या ड्रेस कोडमध्ये 'मेला रूज'मध्ये सहभागी होतील.

शेवटच्या दिवशी 'टस्कर ट्रेल्स' या पहिल्या इव्हेंटमध्ये 'कॅज्युअल चिक' ड्रेसिंग करण्यात आले आहे, जिथे पाहुणे जामनगर शहरातील हिरवेगार वातावरण अनुभवतील. या दिवसाचा दुसरा इव्हेंट असलेल्या 'हस्ताक्षर'मध्ये एलिगंट भारतीय पोषाख हा ड्रेस कोड सुचवण्यात आला आहे.

अब्जाधीश मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा उद्योगपती वीरेन मर्चंट आणि बिझनेसवुमन शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत साखरपुडा किंवा 'रोका' सोहळा पार पडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कपल बऱ्याच काळापासून मित्र आहेत आणि या वर्षी ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

Whats_app_banner