Jamnagar Famous Street Food Items: जामनगर सध्या अंबानी कुटुंबाच्या प्री-ग्रँड वेडिंग सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लवकरच होणाऱ्या लग्नाआधी प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये देश-विदेशातील सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. जामनगरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी गुजरातच्या या शहरातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड घेऊन आलो आहोत. जे जामनगरच्या गल्ल्यांमध्ये मोठ्या आवडीने खाल्ले जातात. तुम्हाला हे स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्यायला आवडेल का?
जामनगरच्या गल्ल्यांमध्ये हा पदार्थ सहज मिळतो. मैद्याच्या पीठात बटाटे, पांढरे वाटाणे, आले, लसूण पेस्ट, कांदा आणि मसाले मिसळून ही पेस्ट भरली जाते. नंतर तयार सारण पिठात भरून रोल करतात. डीप फ्राईड घुघरा शेंगदाणे, शेव आणि गोड आणि आंबट चटणी बरोबर सर्व्ह केले जाते. गुजराती लोकांना हा पदार्थ खूप आवडतो.
कटका ब्रेड हे जामनगरचे आणखी एक आवडते स्ट्रीट फूड आहे. जे कधी कधी ब्रेड चाट नावाने देखील ओळखले जाते. हे चिंचेच्या चटणीत बुडवली जाते आणि उकडलेले बटाटे, शेंगदाणे, डाळिंब आणि चटणी बरोबर सर्व्ह केले जाते. जामनगरच्या लोकांना हा पदार्थ उरलेल्या ब्रेडपासून बनवायला आवडतो.
पाव कट करून त्यात लसूण आणि शेंगण्याची स्पायसी चटणी भरली जाते. हे भरपूर मसाले, शेंगदाणे आणि लिंबाचा रस घालून तयार केले जाते. लसानिया जोटा हे अतिशय तिखट आणि चटपटीत स्ट्रीट फूड आहे. तिखट खायला आवडणाऱ्यांसाठी ही उत्तम डिश आहे.
हा गोड पदार्थ गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहे. म्हैसूर पाकप्रमाणेच ते बेसनापासून तयार केले जाते. पण ही कुरकुरीत जाळी देशी तुपात बनवली जाते. उडीद डाळ आणि शेंगदाण्यापासूनही मसुबू तयार केला जातो.
भजिया म्हणजेच भजे सर्वत्र बनतात. पण जामनगरच्या गल्ल्यांमध्ये गोटा नावाने बनवलेला पदार्थ लोकांना खूप आवडतो. बेसनाच्या पीठात मेथीची पाने, बारीक केलेली हिरवी मिरची आणि आले मिक्स करून तळतात. जामनगरमध्ये हे स्ट्रीट फूड मिळणे सामान्य आहे. हे लोकांना खूप आवडते.