Kashmiri Kid Reporting On Snowfall: काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. इथलं सौंदर्य कोणत्याही ऋतूमध्ये बघण्यासारखं आहे. सध्या हिवाळ्यात काश्मीरमध्ये (viral video of Kashmir)फारच बर्फवृष्टी होतं आहे. हिवाळ्यातील हे काश्मीरचं दृश्य स्वर्गापेक्षा कमी वाटत नाही. चारही बाजूंनी बर्फाने झाकलेलं डोंगर काश्मीरच्या सौंदर्यात भर घालते. या सौंदर्याचे वर्णन करणाऱ्या दोन मुलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. या दोन्ही मुली , काश्मीरच्या सौंदर्याचे त्यांच्याच शब्दात वर्णन करत उत्तम पद्धतीने रिपोर्टींग करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही या मुलींच्या निरागसतेने कौतुक वाटेल. व्हिडीओमध्ये दोन्ही मुली काश्मीरच्या सौंदर्याचे त्यांच्याच शब्दात वर्णन करताना आणि अतिशय व्यावसायिक पद्धतीने रिपोर्ट करताना दिसत आहेत.
उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला आहे. १ मिनिट १३ सेकंदाचा हा क्यूट व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे. व्हिडीओमध्ये लहान मुली अल्लाहने त्यांच्या प्रार्थना स्वीकारल्या आणि हिमवर्षाव केला असे म्हणताना दिसून येत आहे. त्या फारच निरागसपणे सांगत आहेत की बर्फवृष्टीनंतर त्यांना स्वर्गासारखे वाटत आहे. दरम्यान, त्या व्हीडीओमध्ये आई मुलींना विचारते की त्यांना कसे वाटत आहे? त्यांना थंडी वाजत नाहीये ना? यावर मुलगी म्हणते, खूप मजा येते, थंडी आहे, पण मजा तर घ्यायलाच हवी ना? बर्फात खूप मजा असते, बर्फामुळे आपल्या काश्मीरचे सौंदर्य वाढते.
४३१.५ हजार लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. खूप युजर्सने या व्हिडीओवर कमेंट्सही केल्या आहेत. या मुलींचे गोड रिपोर्टींग तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला कमेंट करून सांगा.