मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral: आपल्या भीतीवर कशी मात करायची? आनंद महिंद्रानी Video शेअर करून सांगितली पद्धत!

Viral: आपल्या भीतीवर कशी मात करायची? आनंद महिंद्रानी Video शेअर करून सांगितली पद्धत!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 16, 2024 11:23 AM IST

Anand Mahindra: आनंद महिंद्रा नेहमीच्या त्यांच्या सोशल मीडियावर वेगवगेळ्या पोस्ट करत असतात. त्यांची पोस्ट व्हायरल झाली आहे.

Anand Mahindra shared viral video
Anand Mahindra shared viral video (HT)

Personality Development: आनंद महिंद्रा हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. ते त्यांच्या फॉलोअर्ससाठी नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत (viral video) असतात. त्यांच्या या पोस्ट आपली पर्सनॅलिटी डेव्हलोपमेंट करण्यासाठी फारच उपयुक्त ठरतात. अशीच एक आपल्या फॉलोअर्सला प्रेरणा देण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी १५ जानेवारी रोजी एक पोस्ट शेअर केली. त्याच्या त्या पोस्टमध्ये त्यांनी एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक हत्ती दोन माणसांकडे जाताना दाखवला आहे. या व्हिडीओमधून आनंद महिंद्रा लोकांना संदेश देऊ इच्छित होते.' तुमच्या भीतीचा सामना करा... ' हा संदेश त्यांनी त्यांच्या व्हिडीओमधून दिला आहे.

बघा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओबद्दल डिटेलमध्ये सांगायचे झाले तर याचा अर्थ असा होतो की, हत्ती त्यांच्या जवळ आला तेव्हा ते हलले नाहीत किंवा पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याऐवजी, त्यांनी हत्तीच्या समोर उभे राहून 'त्यांच्या भीतीचा सामना केला', जो नंतर त्यांच्यावर हल्ला न करता मागे हटला.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

महिंद्रा यांच्या नुसार, हत्तीप्रमाणे आपली भीतीही अढळ दृढनिश्चयापुढे नाहिशी होऊ शकते. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “भीतीचे दोन अर्थ आहेत. सर्वकाही विसरून पळून जा किंवा प्रत्येक गोष्टीला सामोरे जा आणि पुढे जा."

 

WhatsApp channel