Amrit Udyan: राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान उघडले, जाणून घ्या येथे कसे जायचे आणि वेळ-amrit udyan reopens at rashtrapati bhavan know how to go and timing ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Amrit Udyan: राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान उघडले, जाणून घ्या येथे कसे जायचे आणि वेळ

Amrit Udyan: राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान उघडले, जाणून घ्या येथे कसे जायचे आणि वेळ

Aug 19, 2024 08:04 PM IST

Amrit Udyan Timing: राष्ट्रपती भवन परिसरात असलेले अमृत उद्यान पुन्हा एकदा जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. स्टोन अॅबॅकस, साऊंड पाईप आणि म्युझिक वॉल अशी आकर्षणाची ठिकाणे आहेत. येथे जाण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण माहिती

अमृत उद्यान
अमृत उद्यान (Shutterstock)

Amrit Udyan at Rashtrapati Bhavan: अमृत उद्यान पूर्वी मुघल गार्डन म्हणून ओळखले जायचे. राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन परिसरात हे ठिकाण आहे. अमृत उद्यान वर्षातून दोनदा उघडते. अशा परिस्थितीत पावसाळ्यासाठी ते खुले करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाने दिलेल्या माहितीनुसार, अमृत उद्यान १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत खुले राहणार आहे. येथे जाण्यापूर्वी जाणून घ्या या ठिकाणाशी संबंधित डिटेल्स

जाण्यापूर्वी करा बुकिंग

अमृत उद्यानात जाण्यापूर्वी बुकिंग करू शकता. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ६ तासांच्या स्लॉटमध्ये तिकिटांचे वाटप केले जाणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता. येथे बुकिंग विनामूल्य आहे. जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करत नसाल तर राष्ट्रपती भवनाच्या गेट नंबर ३५ च्या बाहेर वॉक-इन पर्यटकांसाठी ठेवण्यात आलेल्या सेल्फ सर्व्हिस किऑस्कद्वारे बुकिंग करू शकता.

अतिशय सुंदर आहे अमृत उद्यान

राष्ट्रपती भवन परिसरात असलेल्या अमृत उद्यानातील स्टोन अॅबॅकस, साऊंड पाईप आणि म्युझिक वॉल ही मुख्य आकर्षणे आहेत, ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. येथे येणाऱ्या लोकांना तुळशीच्या बियांपासून बनवलेली 'बीज पत्र' देखील दिली जाणार आहेत, जी एक अनोखी आणि पर्यावरणपूरक स्मृतिचिन्ह आहे.

लक्षात ठेवा या गोष्टी

- जर तुम्ही अमृत उद्यानात जात असाल तर तुमच्या फोनवर सरकारने जारी केलेले फोटो आयडी आणि डिजिटल व्हिजिटर पास ठेवा.

- फोनला परवानगी आहे, परंतु फोटो आणि व्हिडिओ दोन्ही निषिद्ध आहेत.

- पिण्याचे पाणी, सिगारेट, तंबाखू आणि खाद्यपदार्थांना परवानगी नाही.

- पर्यटकांना पाणी, बाळाच्या दुधाच्या बाटल्या, पर्स, छत्री आणि हँडबॅग आणता येतील.

- आत फूड कोर्ट आहे.

अमृत उद्यानात कसे पोहोचावे आणि वेळ

अमृत उद्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत खुले राहील. येथे जाण्यासाठी प्रवेश सायंकाळी ५.१५ वाजता बंद होतो. याशिवाय सोमवारी ते बंद असते. सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन केंद्रीय सचिवालय आहे, जे पिवळ्या आणि जांभळ्या रेषेने जोडलेले आहे. मेट्रो स्थानकातून शटल बस सेवा उपलब्ध होणार असून, ही मोफत शटल बस सेवा आहे.

विभाग