Amitabh Bachchan Diet: बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. सध्या ते सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती' या शोच्या १६ व्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत. अमिताभ बच्चन केवळ आपल्या अभिनयामुळेच नव्हे तर वयाच्या ८१ व्या वर्षीही ते त्यांच्या फिटनेसबद्दलही चर्चेत राहतात. आजही ते सेटवर एखाद्या नवख्या अभिनेत्यालाही लाजवतील इतके सक्रिय असतात. अमिताभ बच्चन या वयातही इतकी ऊर्जा कुठून आणतात असा सर्वांना प्रश्न पडतो.विविध माध्यमातून सतत अमिताभ बच्चन यांच्या फिटनेसबाबत बोलले जाते. त्यांच्या फिटनेसचे हे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर या लेखात आम्ही तुम्हाला त्याच्या फिटनेसचे रहस्य सांगणार आहोत. चला जाणून घेऊया वयाच्या ८२ व्या वर्षी अमिताभ स्वतःला कसे तंदुरुस्त ठेवतात...
'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या फिटनेस आणि घराशी संबंधित काही गोष्टी शेअर करताना दिसतात. एका ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, त्यांचा दिवस तुळशीच्या पानांनी सुरू होतो. यानंतर ते त्यांच्या नाश्त्यात प्रोटीन शेक, दलिया आणि बदाम यांसारख्या गोष्टी खातात. इतकेच नाही तर नाश्त्यात आवळा ज्यूस आणि खजूर घेणेही त्यांना आवडते.
अमिताभ यांनी नॉनव्हेज आणि गोड पदार्थ खात नसल्याचा खुलासा केला आहे. तरुणपणी ते सर्व काही खात असले तरी आता त्यांनी मिठाई, मांसाहार आणि भात खाणे पूर्णपणे सोडून दिले आहे. यासोबत त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले होते की, जया बच्चन यांची आवडती डिश मासे आहेत.
अमिताभ बच्चन आपल्या डाएटवरच पूर्ण लक्ष देत नाहीत, तर वर्कआउटवरही पूर्ण लक्ष देतात. ते त्यांच्या आहारात संतुलित आहार घेतात. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते योगदेखील करतात. यासोबतच जॉगिंग आणि वॉकिंगचाही रूटीनमध्ये समावेश आहे. ते सुमारे ८ तास झोप घेतात. ज्यामुळे शरीरात थकवा येत नाही. फिटनेस ट्रेनरच्या माहितीनुसार, त्यांना नियमितपणे प्राणायाम, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि काही योगासने करायला लावली जातात. तसेच त्यांना लाइट स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ करायला आवडते. यामुळे त्यांच्या शरीरात लवचिकता वाढते आणि त्यांची मानसिकताही सुधारते.
अमिताभ बच्चन चित्रपटांमध्ये धूम्रपान करताना दिसले असतील, परंतु वास्तविक जीवनात ते यापासून दूरच राहतात. याशिवाय ते दारूपासूनही दूर राहतात. बिग बी चहा-कॉफीचेदेखील सेवन करत नाहीत. रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन मिठाईपासून दूर राहतात. केक आणि पेस्ट्री व्यतिरिक्त तेभारतीय मिठाई देखील खात नाहीत. हे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल, परंतु बिग बी हे सर्वकाही त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी करतात.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )