मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Shopping: वर्ल्ड स्लीप डे निमित्त अमेझॉनचा खास सेल! मिळतील उत्तम डील्स

Shopping: वर्ल्ड स्लीप डे निमित्त अमेझॉनचा खास सेल! मिळतील उत्तम डील्स

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 18, 2023 12:08 PM IST

World Sleep Day Sale: अमेझॉनवर एकाच ठिकाणी ग्राहक मॅट्रेस, बेड, उशा, बेडशीट आणि तुमच्या झोपेच्या सर्व आवश्यक गोष्टींवर ७५% पर्यंत सूट मिळवू शकतात.

Amazon World Sleep Day sale
Amazon World Sleep Day sale

Amazon Sale: झोप हा प्रत्येकाच्या एकूण आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. चला तर मग, १५ ते १९ मार्च या कालावधीत नियोजित विक्रीसह अमेझॉन वर्ल्ड स्लीप डे निमित्त आकर्षक डील आणि ऑफर देत असल्याने आपण स्वत:ला उत्तम झोप आणि निरोगी मन देऊ या. अमेझॉनवर एकाच ठिकाणी ग्राहक मॅट्रेस, बेड, उशा, बेडशीट आणि तुमच्या झोपेच्या सर्व आवश्यक गोष्टींवर ७५% पर्यंत सूट मिळवू शकतात आणि त्यांचे घर आनंदी जगात बदलू शकतात. या जागतिक झोपेच्या दिवशी ५०+ अग्रेसर ब्रँडमध्ये १०००+ डीलचा लाभ घ्या आणि तुमच्या झोपेचा उपाय मिळवा.

तुमच्या दैनंदिन झोपेच्या आवश्यक गोष्टींसाठी खरेदी करताना ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI ऑफरवर १०% पर्यंत तात्काळ सूट मिळू शकते. दि स्लीप कंपनी, लिव्हप्योर, अॅमेझॉन ब्रँड सोलिमो, ड्युरोफ्लेक्स आणि स्लीपीहेड यांसारख्या लोकप्रिय ब्रँडवर ग्राहक शेड्यूल केलेले वितरण, गुणवत्ता-पडताळणी केलेली निवड आणि २४ महिन्यांपर्यंत* विनाखर्च EMI सारखे फायदे देखील मिळवू शकतात.

रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी मॅट्रेस आणि बेड

● दि स्लीप कंपनी स्मार्टग्रीड ऑर्थो मॅट्रेस: ऑर्थो टेक्नॉलॉजीसह हे स्मार्टग्रिड मॅट्रेस तुमच्या मणक्याला अत्यंत सपोर्ट देऊन एर्गोनॉमिकली शरीराच्या कोणत्याही प्रकाराशी जुळवून घेते. ही तीन प्रकारांमध्ये येते - ५”, ६’’ आणि ८’’. गादी फूड ग्रेड मटेरिअलपासून बनवली आहे आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. ही अमेझॉन डॉट इन वर २७,९९० रूपयांमध्ये मिळवा.

● स्लीपीहेड फ्लिप – ड्वेल साईडेड हाय डेंसिटी फोम मॅट्रेस - स्लीपीहेड फ्लिप नवीन फ्लॅप होण्यायोग्य डबल साईडेड मॅट्रेस देते. एक बाजू उच्च घनतेच्या फोमने लेयर केलेली असते जी तुमच्या शरीराला उत्तम प्रकारे आधार देते आणि दुसरी मऊ बाजू असते, ज्यामध्ये आरामदायी लेयर असते जी तुम्हाला कुशन देते. हे अमेझॉन डॉट इन वर रूपये १०,३५९ मध्ये मिळवा

● वेकफिट मॅट्रेस - वेकफिटचे ऑर्थोपेडिक मेमरी फोम मॅट्रेस तुमच्या मणक्याला नैसर्गिकरित्या आधार देऊन तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते. तुमच्या शरीराच्या काही भागांना आधार देण्यासाठी मॅट्रेसमध्ये वेगवेगळे झोन असतात आणि तुम्हाला चांगली झोप मिळावी म्हणून तुमच्या शरीराची काळजी घेणे योग्य असते. ही अमेझॉन डॉट इन वर रूपये १४,६२६ मध्ये मिळवा.

अत्याधुनिक सोफा कम बेड

● सोलिमो रोलँड ५ सीटर एल आकार सोफा कम बेड - सोलिमो रोलँड ५ सीटर एल शेप फोल्डेबल सोफा बेड आवश्यकतेनुसार सोयीस्करपणे आरामदायक बेडमध्ये बदलतो. कमीतकमी गडबड करून तुम्ही कुटुंब आणि मित्रांना भेट देण्यासाठी आरामदायी झोपण्याची जागा देऊ शकता. प्रत्येक वैयक्तिक आसनावर १०० किलो आणि २०,००० सायकलसाठी बॅकरेस्ट आणि १०,००० सायकलसाठी ४० किलो डायनॅमिक लोडिंगसह आर्मरेस्ट स्थिरतेची चाचणी केली जात असल्याने, ते टिकण्यासाठी तयार केले गेले आहे. हे अमेझॉन डॉट इन वर १८८९९ मध्ये मिळवा.

● उबरलाईफ २ सीटर सोफा कम बेड ज्युट फॅब्रीक वॉशेबल कव्हर २ कुशन सह - अल्टिमेट स्पेस सेव्हर सोल्यूशनसह, हे ३ इन १ सोफा बेड आहे, म्हणजे गेमटाइम लाउंजर, दिवसा सोफा आणि रात्रीचा बेड. सहज ड्राय क्लीनसाठी काढता येण्याजोग्या झिपर कव्हरसह देखरेख करणे सोपे आहे. हे अमेझॉन डॉट इनवर ८,३४९ रुपये मध्ये मिळवा.

खोलीचे वातावरण नियंत्रित ठेवा

● फिलिप्स जॉय व्हिजन कोरल रश ०.५ वॅट एलईडी बल्ब नाईट लँप - इतर कोणताही बल्ब नाही असा हा लाईट बल्ब. १५.००० तासांपर्यंतच्या आयुष्यासह, हा फिलिप्स LED लाईट १५ वर्षांपर्यंत तुमचे इच्छित वातावरण सुनिश्चित करेल. जेव्हा तुम्ही फिलिप्स LED लाइट बल्बवर स्विच करता, तेव्हा तुम्ही लाइट आउटपुट आणि गुणवत्तेचा त्याग न करता ९०% पर्यंत कमी ऊर्जा वापरता. हा अमेझॉन डॉट इनवर रूपये ११९ मध्ये मिळवा.

● नियामॅक्स स्काय नाईट प्रोजेक्टर बेड लाईट लँप - हा नाईट लाइट मुलाच्या बेडरूमसाठी योग्य भेट आहे आणि नाईट लँप म्हणून वापरला जाऊ शकतो. रंगीत प्रोजेक्टेड स्टार सह लग्न, वाढदिवस पार्टी किंवा ख्रिसमसच्या वेळी सजावटीसाठी तुम्ही वापर करू शकता. तुम्ही रोमँटिक नाईट लँप किंवा सजावटीच्या नाईट लँप म्हणून देखील वापरू शकता. हे अमेझॉन डॉट इनवररूपये ४२९ मध्ये मिळवा.

WhatsApp channel

विभाग