Health Benefits of Green Garlic Leaves: आरोग्यासाठी लसूणचे फायदे तुम्हाला माहीत असतील. लसणाप्रमाणेच त्याची पाने आणि हिरवा लसूण देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. साधारणपणे हिवाळ्यात मिळणारी लसणाची हिरवी पाने चटणीमध्ये टाकली जातात. किंवा ही पाने काही देसी पदार्थांमध्ये घालतात. हिरवा लसूण आणि त्याची पाने केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच वापरली जात नाहीत तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. ही पाने खाल्ल्याने आरोग्यासाठी काय फायदे होतात आणि हे कसे खावे ते जाणून घ्या.
हिरवा लसूण आणि त्याची पाने यामध्ये पौष्टिकतेची कमतरता नसते. यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक हे चांगल्या प्रमाणात असतात. जे शरीराला अनेक फायदे देतात.
हिरवा लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात हिरवा लसूण आणि पाने कोणत्याही पदार्थात मिसळून खाल्ल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. हिरव्या लसणात व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेशींना समर्थन देते.
हिरव्या लसणात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात. हे शरीराला बुरशी आणि इतर बॅक्टेरियापासून वाचवण्यास मदत करतात.
हिरवा लसूण आणि त्याची पाने खाल्ल्याने कॅन्सरच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध होतो. हिरव्या लसणात एलिसिन नावाचा सक्रिय घटक असतो जो कर्करोगाच्या पेशी नष्ट करतो. याव्यतिरिक्त सेलेनियम आणि अँटी ऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल डॅमेज आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात.
हिरव्या लसणात आढळणारे एलिसिन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी चांगले आहे. हा घटक रक्तवाहिन्यांना कडक होण्यापासून आणि त्यामध्ये प्लेक जमा होण्यापासून प्रतिबंधित करतो. हे कोलेस्टेरॉलसाठी आवश्यक असलेले एंजाइम देखील तयार करते.
हिरवा लसूण ताण आणि स्ट्रेसमुळे तणावामुळे होणारा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये असलेले एलिसिन हे हायपरटेन्सिव्ह एजंट म्हणूनही काम करते. जे रक्तदाब कमी करते आणि उच्च रक्तदाब सामान्य करण्यास मदत करते.
याप्रमाणे हे हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हिरवा लसूण खाल्ल्याने त्वचेवर आणि केसांवरही परिणाम दिसून येतो.
हिरवा लसूण आणि त्याची पाने कोणत्याही भाजी किंवा पदार्थात मिसळून सहज खाता येतात. जर तुम्हाला त्याचे आरोग्य फायदे मिळवायचे असतील तर हिरव्या लसणाच्या पानांची चटणी करून खा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)