Honey Water: पाण्यात मध मिसळून प्यायल्याने मिळतात अनेक फायदे, दिवसाची सुरुवात करण्यासाठी आहे बेस्ट ड्रिंक
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Honey Water: पाण्यात मध मिसळून प्यायल्याने मिळतात अनेक फायदे, दिवसाची सुरुवात करण्यासाठी आहे बेस्ट ड्रिंक

Honey Water: पाण्यात मध मिसळून प्यायल्याने मिळतात अनेक फायदे, दिवसाची सुरुवात करण्यासाठी आहे बेस्ट ड्रिंक

Jan 19, 2024 09:55 AM IST

Morning Routine: तुमच्या दिवसाची हेल्दी सुरुवात करण्यासाठी तुम्ही मधाचे पाणी पिऊ शकता. रोज सकाळी हे प्यायल्याने अनेक प्रकारच्या समस्यांना दूर होतात. पाण्यात मध मिसळून प्यायल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात ते जाणून घ्या.

सकाळी मधाचे पाणी पिण्याचे फायदे
सकाळी मधाचे पाणी पिण्याचे फायदे (unsplash)

Health Benefits of Drinking Honey Water: बहुतांश लोक सकाळची सुरुवात चहा-कॉफीने करतात. तर काही लोक वजन कमी करण्यासाठी पाण्यात मध मिक्स करून पितात. पण तुम्हाला माहीत आहे का मधाचे पाणी तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. मधामध्ये अँटी इंफ्लेमेटरी, औषधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे विविध रोग बरे होतात. याशिवाय अनेक प्रकारे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चला तर जाणून घ्या पाण्यात मध मिसळून प्यायल्याने कोणते फायदे मिळतात.

पचन आणि इम्युनिटीसाठी उत्तम

मधामध्ये फायबर असते. त्यामुळे ते पचनासाठी चांगले असते. मधाचे पाणी सूज कमी करते आणि पचन सुधारते. हे आपल्या शरीरातील हानिकारक रसायनांचे प्रमाण कमी करते जे ब्लोटिंग आणि गॅससाठी जबाबदार असतात. याशिवाय मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.

सर्दी खोकला होतो दूर

अभ्यासातून असे दिसून आले आहे की एक ग्लास कोमट पाण्यात मध टाकून प्यायल्याने सामान्य सर्दी, ताप आणि खोकला टाळता येतो. अशा परिस्थितीत तुम्ही रोज सकाळी हे पिऊ शकता.

वजन कमी करण्यास उपयुक्त

वजन वाढल्याने खराब पचन, बद्धकोष्ठता, मंद चयापचय आणि इतर पाचन समस्या उद्भवतात. मधाचे पाणी या सर्व समस्यांशी लढते आणि तुमचे चयापचय वाढवते. ज्यामुळे तुमचे वजन कमी होते. यासोबतच रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट मधाचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

हृदयविकारात फायदेशीर

मधाचे पाणी प्यायल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून बचाव होतो. जर तुम्हाला तुमचा रक्तदाब, हायपरटेंन्शन आणि कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर या ड्रिंकने तुमच्या दिवसाची सुरुवात करा.

निस्तेज आणि कोरडी त्वचा होईल दूर

डिहायड्रेशनमुळे तुमची त्वचा निस्तेज आणि कोरडी होऊ शकते. त्यामुळे सकाळी योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने तुमची त्वचा दिवसभर ताजी आणि मुलायम राहते.

 

कसे बनवायचे मधाचे पाणी

हे बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी गरम करा. नंतर त्यात एक चमचा मध घालून चांगले मिक्स करा. बेस्ट रिझल्टसाठी तुम्ही त्यात १ चमचा लिंबाचा रस देखील घालू शकता. हे ड्रिंक रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner