Healthy Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळच्या चहासोबतचा नाश्ता असो, नाश्त्यात काय नवीन बनवायचे याचा रोज विचार करावा लागतो. पण आम्ही आज अशा एका रेसिपीबद्दल सांगणार आहोत, जी झटपट तयार करता येते. तुम्ही पोहे बनवतच असाल, पण बटाटा पोहा कटलेटचे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? हे पोहे आणि बटाटे एकत्र करून बनवले जाते. सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हे कटलेट खाल्ले जाऊ शकते. हे बनवायला खूप सोपे आहे आणि वेळही कमी लागतो. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी...
२ कप- पोहे, ३ उकडलेले- बटाटे, २ टीस्पून- मैदा, १/२ कप- ब्रेडचा चुरा, १/२ टीस्पून- काळी मिरी पावडर, १ टीस्पून- चाट मसाला पावडर, १/२ टीस्पून- लाल तिखट , १/२ टीस्पून, २ टीस्पून- गरम मसाला पावडर, २- बारीक चिरलेली मिरची, १ तुकडा- बारीक चिरलेल आले, ४ टीस्पून- कोथिंबीर पाने, १ टीस्पून- लिंबाचा रस, अंदाजे तेल, चवीनुसार - मीठ
सुमारे एक मिनिट पोहे पाण्याने धुवा आणि पाणी काढून टाकल्यानंतर सुमारे १० मिनिटे तसेच ठेवा. आता उकडलेल्या बटाट्याची साल सोलून मॅश करा. एका भांड्यात बटाटे, मीठ, काळी मिरी पावडर, गरम मसाला पावडर, चाट मसाला पावडर, लाल तिखट, आले, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले मिक्स करा. या मिश्रणाचे कटलेट बनवा. एका भांड्यात मैदा टाका आणि त्यात पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा.
या पेस्टमध्ये मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. आता कटलेट एकामागून एक पिठाच्या मिश्रणात बुडवा आणि नंतर ब्रेड क्रम्ब्सवर रोल करा. कढई गरम करून त्यात थोडे तेल घालून कटलेट एका बाजूने सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. आता उलटा करून तळून घ्या. कटलेट तयार आहेत. सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
संबंधित बातम्या