Punjabi style Aloo Paratha recipe marathi: हिवाळ्यात थंड वातावरणात नाश्त्यात बटाटा, मुळा, कोबी आणि कांदा यांसारख्या भाज्यांपासून बनवलेले गरमागरम पराठे खावेसे वाटतात. तुम्हीही तुमच्या घरच्या स्वयंपाकघरात बटाट्याचे सामान्य पराठे अनेकदा तयार करून खाल्ले असतील. पण जर तुम्हाला बटाट्याच्या पराठ्यांमध्ये पंजाबी ढाबा स्टाईल मसालेदार चव आणायची असेल तर ही रेसिपी तुम्हाला मदत करू शकते. ही रेसिपी बनवायलाच अगदी सोपी नाही तर झटपट तयारही होते. बटाट्याच्या पराठ्याची ही रेसिपी तुम्ही दही, लोणचे किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया चविष्ट पंजाबी ढाबा स्टाइल बटाटा पराठा म्हणजेच आलू पराठा कसा बनवायचा.
- 2 कप मैदा
- 5 उकडलेले बटाटे
-2 किसलेले कांदे
- 1 टीस्पून आले लसूण पेस्ट
-1/4 वाटी कोथिंबीर
- 1 टीस्पून धने-जिरेपूड
- 1 टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
-1/4 टीस्पून हळद
- 1 टीस्पून लाल मिरची पावडर
-2 पॅकेट मॅगी मसाला
-3 चमचे तेल
- भाजण्यासाठी तूप/तेल
- चवीनुसार मीठ
आलू पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मैदा घ्या, त्यात ३ चमचे तेल आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. आता पाण्याच्या मदतीने पीठ मऊसूत मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर त्यावर थोडे तेल लावून १५ मिनिटे तसेच सोडा. यानंतर बटाट्याचा मसाला बनवण्यासाठी दुसऱ्या भांड्यात बटाटे चांगले बारीक करून त्यात कांदा, लसूण आले पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची पेस्ट, हळद आणि उरलेले मसाले घाला. मसाल्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आता या मिश्रणाचे समान आकाराचे गोळे बनवा. पीठ पुन्हा चांगले मळून घ्या आणि त्याचे तितकेच मोठे गोळे करा जितके बटाट्याचे आहेत. यानंतर कणकेचा गोळा घेऊन त्यावर कोरडे पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्या.
आता बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा चपातीच्या मध्यभागी ठेवून सर्व बाजूंनी दुमडून बंद करा. आता तयार पीठ तळहाताने दाबून चपटा करून थोडे कोरडे पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्या. नंतर तवा मध्यम आचेवर गरम करा, त्यावर थोडं तूप लावा आणि लाटलेला पराठा भाजण्यासाठी तव्यावर ठेवा. पराठा थोडा वेळ शिजल्यानंतर उलटा. आता दुसऱ्या बाजूने तूप लावून पराठा दोन्ही बाजूंनी नीट भाजून घ्या. अशाप्रकारे तुमचा चविष्ट बटाट्याचा म्हणजेच आलूचा पराठा तयार आहे. आता दही आणि लोणच्याबरोबर सर्व्ह करा.