Aloe Vera: कोरफडीचा वापर सामान्यतः स्किन केअरमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. कोरफडीच्या पानांमधून पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडतो. ज्याला एलोवेरा जेल म्हणतात. हे जेल अनेक अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. याचे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी एलोवेरा जेल खूप उपयोगी आहे. पण कोरफड जेलच्या वापराविषयी माहिती असणे आवश्यक आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
> पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही कोरफडीचे जेल गरम पाण्यासोबत घेतल्यास वजन कमी होऊ शकते. गरम पाण्यात एक चमचा एलोवेरा जेल घालून चांगले मिसळा. यामुळे पोटावरील चरबी दूर होऊ शकते.
> दुसरा मार्ग म्हणजे सर्वप्रथम कोरफडीची पाने नीट धुवून घ्या. त्यानंतर ते जेल काढा आणि एका ग्लास पाण्यात मिसळा. आता या मिश्रणात लिंबाचा रस घालून सेवन करा. असे केल्याने पोटाची चरबी सहज काढता येते.
> एलोवेरा जेलचे जेवणापूर्वी सेवन केल्यास पोटावर जमा झालेली अतिरिक्त चरबी देखील दूर होऊ शकते.
> एलोवेरा जेल आणि गिलॉय दोन्ही आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा एलोवेरा जेल मिसळून त्यात एक चमचा गिलॉय ज्यूस टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन केले तर पोटासाठी अनेक फायदे होऊ शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)