Allergic to Artificial jewellery: सध्या लग्न सराई सुरु झाली. लग्नात ट्रेडिशनल कपड्यांवर आर्टिफिशियल ज्वेलरी घालण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. कारण सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. याशिवाय तेच तेच डिझाईनचे दागिने किती वेळा घालणार असाही प्रश्न पडतो. त्यामुळे आजकाल आर्टिफिशियल ज्वेलरी घालण्याचा ट्रेंड जास्त वाढला आहे. आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये अनेक प्रकारच्या डिझाईन्स उपलब्ध आहेत. पण काही लोकांना आर्टिफिशियल ज्वेलरी घातल्यानंतर अॅलर्जी देखील होते. अशा परिस्थितीत असे आर्टिफिशियल ज्वेलरी घालण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचे मत घेणे आवश्यक आहे. त्याच्या टिप्समुळे तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. चला जाणून घेऊयात त्या टिप्सबद्दल...
जर तुम्हाला आर्टिफिशियल ज्वेलरी घातल्यावर अॅलर्जी होत असेल, तर तुम्ही ते घालण्यापूर्वी काही अँटीसेप्टिक लोशन लावावे. याशिवाय आर्टिफिशियल ज्वेलरी स्वछ ठेवावी. ही ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गरम पाणी आणि कोणतेही अँटीसेप्टिक द्रव वापरू शकता. नेहमी ज्वेलरी वापरून झाल्यावर स्वच्छ करून ठेवा. म्हणजे हवं तेव्हा ज्वेलरी वापरू शकता. याशिवाय अशाप्रकारे ज्वेलरी स्वच्छ करून परिधान केल्याने तुमचा त्वचेवरील अॅलर्जी आणि इतर समस्यांपासून बचाव होईल.
अॅलर्जीची समस्या असल्यास, स्वतः उपचार करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. स्वतःच स्वतःवर उपचार केल्याने तुमची समस्या आणखी वाढू शकते. त्वचा तज्ज्ञ डॉ.अनिका गोयल यांनी तिच्या इंस्टाग्रामवर आर्टिफिशियल ज्वेलरीमुळे होणारी अॅलर्जी टाळण्यासाठी उपाय सांगितले आहेत. या तज्ञांच्या टिप्स फॉलो करून तुम्ही कोणतीही काळजी न करता तुमची फॅशन करू शकाल आणि अॅलर्जीपासूनही सुरक्षित राहाल.
> त्रास होत असल्यास दागिने लवकरात लवकर काढा.
> तुमची त्वचा इमोलिएंट्स लोशनने शांत करा.
> त्वचाविज्ञानाशी सल्लामसलत न करता काही करू नकात.
> वैयक्तिकृत सल्ल्यासाठी तुमच्या त्वचाविज्ञानाशी संपर्क साधा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या