Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्ट हिची हटके स्टाईल सगळ्यांना प्रभावित करते. फॅशन इंडस्ट्रीत सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या शोमध्ये बॉलिवूड सुंदरींनीही भाग घेतला होता. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, शर्वरी वाघ, अदिती राव हैदरी आणि आलिया भट्ट देखील पोहोचल्या. मात्र, या सगळ्यांमध्ये आलिया भट्ट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. बोल्ड ब्लाउज आणि काळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं.
आलिया भट्टनं एनएमएसीसीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सब्यसाचीची काळ्या रंगाची साडी निवडली. तिनं मेटॅलिक धागे, सिक्विन आणि मौल्यवान स्टोननं जडलेले मेटॅलिक ब्लाउज परिधान केले होते. बॅकलेस आणि प्लँगिंग व्ही नेकलाइनसह बोल्ड स्टाईल आलियाच्या सौंदर्यात भर घातली.
आलिया भट्टनं सब्यसाचीच्या लेटेस्ट कलेक्शनमधून मुर्शिदाबाद सिल्क साडी निवडली आहे. या साडीचा पदर समोरच्या बाजूनं सैल करून खांद्यावर टेकवला होता. त्याचबरोबर लो वेस्ट आणि फ्रंट प्लीट्स ड्रेसिंग लुकमुळं हा लूक अधिकच बोल्ड झाला होता.
केवळ साडी आणि ब्लाऊजच नव्हे, इतर सौंदर्यवतींपेक्षा वेगळा दिसण्यासाठी आलिया भट्टनं खास हेअरस्टाईल निवडली. रेट्रो लूकनं बाजूच्या ट्विस्टेड बनसह झुलत्या झुमक्यांनी तिच्या लूकला वेगळाच साज चढवला होता.
संबंधित बातम्या