Alcohol Addiction:दारूच्या व्यसनावर आयुर्वेदात आहे सोपा उपाय, 'हे' चूर्ण फक्त ३० दिवस घेतल्याने सुटते व्यसन-alcohol addiction this ayurvedic powder is useful in alcoholism ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Alcohol Addiction:दारूच्या व्यसनावर आयुर्वेदात आहे सोपा उपाय, 'हे' चूर्ण फक्त ३० दिवस घेतल्याने सुटते व्यसन

Alcohol Addiction:दारूच्या व्यसनावर आयुर्वेदात आहे सोपा उपाय, 'हे' चूर्ण फक्त ३० दिवस घेतल्याने सुटते व्यसन

Sep 14, 2024 03:24 PM IST

Ayurvedic Remedies to Quit Alcohol: दारू सोडण्यासाठी अनेकदा लोक विविध प्रकारच्या व्यसनमुक्ती केंद्रांची आणि औषधांची मदत घेतात. परंतु काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय देखील खूप प्रभावी ठरू शकतात.

Ayurvedic Remedies to Quit Alcohol- दारू सोडण्यासाठी आयुर्वेदिक उपाय
Ayurvedic Remedies to Quit Alcohol- दारू सोडण्यासाठी आयुर्वेदिक उपाय (freepik)

Home Remedies to Quit Alcohol: दारूच्या व्यसनातून मुक्त होणे सोपे नाही. पण योग्य उपाययोजना आणि प्रबळ इच्छाशक्तीने हे शक्य होऊ शकते. अनेकदा लोक विविध प्रकारच्या व्यसनमुक्ती केंद्रांची आणि औषधांची मदत घेतात. परंतु काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय देखील खूप प्रभावी ठरू शकतात. लोकांचं असं म्हणणं आहे की, महागडी औषधे वापरूनही त्यांचा प्रभाव मर्यादित कालावधीसाठी टिकतो. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी खास आयुर्वेदिक चूर्ण वापरून दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्याचा एक प्रभावी उपाय सुचवला आहे. जो ३० दिवस नियमित सेवन केल्यास आश्चर्यकारक परिणाम मिळू शकतात.

हे चूर्ण कसे बनते?

ही पावडर पूर्णपणे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार केली जाते. त्यात समाविष्ट केलेले अश्वगंधा हे एक प्रभावी औषध आहे. जे शरीर आणि मनाला शांती प्रदान करते. ताणतणाव आणि मानसिक अस्वस्थता कमी करून दारूची लालसा कमी करते. तर शंखपुष्पी मन शांत आणि एकाग्र होण्यास मदत करते. दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. कारण यामुळे मन शांत राहते आणि दारूची सवय नियंत्रित करता येते.

तसेच यात असणारे गिलोय शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास तसेच अल्कोहोलचे हानिकारक प्रभाव कमी करण्यास मदत करते. हे शरीर डिटॉक्सिफाय करते आणि औषधांची लालसा कमी करते. भृंगराज औषधी वनस्पती शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील उपयुक्त आहे. जे अल्कोहोलमुळे शरीरात जमा होतात. हे शरीर स्वच्छ करून दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यास प्रभावी ठरते.

हे आयुर्वेदिक चूर्ण वापरण्याची पद्धत-

तज्ज्ञ राम कुमार सांगतात की, या आयुर्वेदिक चूर्णचा योग्य आणि नियमित वापर केल्यास ३० दिवसांत दारूच्या व्यसनापासून मुक्ती मिळू शकते. सकाळ संध्याकाळ जेवणानंतर १ चमचा चूर्ण मध किंवा कोमट पाण्यासोबत घ्या. शक्य असल्यास, ते सकाळी रिकाम्या पोटी घेणे अधिक प्रभावी असू शकते. हे चूर्ण ३० दिवस सतत घेतल्याने शरीर हळूहळू दारूच्या लालसेपासून मुक्त होते.

आयुर्वेदिक चूर्णचे परिणाम-

या आयुर्वेदिक चूर्णमुळे दारूचे व्यसन तर कमी होतेच. पण याच्या वापराने व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक स्थितीही सुधारते. असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. ३० दिवसांच्या नियमित सेवनाने, अल्कोहोलची लालसा पूर्णपणे काढून टाकली जाऊ शकते आणि शरीर हळूहळू निरोगी स्थितीत परत येते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner