Ajwain Water Benefits In Marathi: भारतीय स्वयंपाकघरातील मसाले औषधाचे काम करतात, हे तुम्ही अनेकदा वाचले आणि ऐकले असेल. आपल्या स्वयंपाक घरातील असाच एक मसाला म्हणजे ओवा. ओवा बिया स्वरूपात अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. प्रसूतीनंतरही अनेक महिलांना ओवा पाण्यात उकळून दिला जातो. ओव्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे असून, गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे सेवन केले पाहिजे. चला जाणून घेऊया ओव्याचे पाणी पिण्याचे काही जबरदस्त फायदे...
ओव्यामध्ये अँटी मायक्रोबाईल गुणधर्म असतात. म्हणजेच ते बॅक्टेरिया आणि बुरशीपासून संरक्षण करते. ओव्यामध्ये थायमॉल आणि कार्व्हाक्रोल आढळतात, जे जीवाणूनाशक आणि बुरशीनाशक आहेत. एका टेस्ट ट्यूब अभ्यासानुसार, ओव्यामुळे अन्नातून विषबाधा होणाऱ्या बॅक्टेरिया देखील नष्ट होऊ शकतात. त्यामुळे ओवा तुमच्या पोटासाठी चांगला ठरू शकते.
जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर, ओव्याचे पाणी फायदेशीर ठरू शकते. ओव्यामध्ये आढळणारे थायमॉल कॅल्शियम वाहिन्यांना अवरोधित करण्याचे काम करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचा दाब कमी होतो. तथापि, यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.
संशोधनानुसार, ओव्याच्या बिया शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ओव्याची पावडर शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.
ओव्यामध्ये आढळणारे थायमॉल चयापचय गतिमान करते यामुळे चरबी पेशी देखील खंडित होतात. जर, तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर ओव्याच्या बिया रात्रभर भिजवून पाण्यात ठेवा आणि सकाळी पाण्यात उकळा व ते पाणी सकाळी प्या.
ओव्यामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. यामुळे बाळाच्या जन्मानंतर मातेला आणि बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो. याशिवाय ते पोटासाठीही चांगले असते. मात्र, गरोदर महिलांनी आणि स्तनपान सुरू करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय चुकुनही ओवा किंवा ओव्याचे पाणी सेवन करू नये.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या