Where is airplane toilet poop thrown: अलीकडच्या काळात प्रवास हा लोकांचा आवडता छंद बनला आहे. प्रत्येकजण प्रवासासाठी आपापल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार वेगवेगळ्या साधनांची निवड करतो. कुणी बस, कुणी कार, कुणी रेल्वे तर कुणी विमान. आणि भाडे प्रत्येकाचे वेगळे असते. यातील सर्वात महागडा विमान प्रवास आहे. परंतु सर्वात सुरक्षित प्रवासदेखील हवाई प्रवास आहे. काही लोकांना विमानाने प्रवास करणेही आरामदायक वाटते. याचे कारण म्हणजे ट्रेन किंवा बसने कुठेतरी पोहोचण्यासाठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात तुम्ही विमानाने कुठेतरी पोहोचू शकता. महत्वाचे म्हणजे आजकाल श्रीमंतांबरोबरच सामान्य माणूसही यातून प्रवास करू लागला आहे.
तस पाहायला गेलं तर, विमानात सर्व प्रकारच्या सामान्य सुविधा उपलब्ध असतात. यामध्ये टॉयलेटचीही सोय आहे. विमानाने कधीही प्रवास न केलेल्या अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की, विमान प्रवासादरम्यान एखादी व्यक्ती शौचालयात जाते तेव्हा तो कचरा कुठे जातो? हे मला विमानातून खाली फेकले जाते की, काय असा तुमचाही संभ्रम आहे का? तर आज आपण तुमच्या याच सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.
विमानातून मानवी विष्ठा आणि मूत्र कुठेतरी खाली पडत नाही ना असे विचित्र विचार अनेकदा मनात घोळतात? पण थांबा, आश्चर्यचकित होऊ नका, हे असे अजिबात होत नाही. वास्तविक, विमानात एक अतिशय लहान टॉयलेट असते. याशिवाय लघवी आणि विष्ठा साठवण्यासाठी टाकीही बनवलेली असते. आता तंत्रज्ञान इतके वाढले आहे की, फ्लाइटमध्ये व्हॅक्यूम टॉयलेट आहेत. शौचालये फ्लश करण्यासाठी पाण्याचा वापर केला जात नाही.
अर्थातच या या व्हॅक्यूम सिस्टीमद्वारे मलमूत्र हा मानवी कचरा थेट टाकीमध्ये जाऊन गोळा केला जातो. टाकीमध्ये टाकाऊ वस्तू साठवण्याची क्षमता जवळपास दोनशे लिटर असावी. ही क्षमता सर्व विमांनामध्ये वेगवेगळी असू शकते. तर अशाप्रकारे हे सर्व टाकाऊ पदार्थ त्या टाकीमध्ये साठवून ठेवले जातात. आता त्या मलमूत्राचा विल्हेवाट कशी लावली जाते हेसुद्धा आपण पाहूया.
तर विमान खाली उतरताच टाकी रिकामी करण्याचे काम सुरू होते. हे काम करण्यासाठी स्वच्छतागृह कर्मचारी किंवा शौचालय कर्मचारी येतात. हे लोक फ्लाइट जवळ एक टाकी आणतात. या शौचालयाच्या टाकीला रुंद नळी असते, जी विमानात बसवलेल्या टॉयलेट टाकीला जोडलेली असते. मग बटण चालू होताच, फ्लाइट टाकीमध्ये जमा केलेले मलमूत्र काही मिनिटांतच लवकर शौचालयाच्या टाकीत जाते. अशा प्रकारे फ्लाइट टाकी रिकामी होते. त्यानंतर योग्य ठिकाणी जाऊन ते रिकामे करण्याचे काम केले जाते.
संबंधित बातम्या