World Kidney Day 2024: किडनीचे गंभीर आजार टाळण्यासाठी या सवयी अंगीकारा!-adopt these habits to prevent serious diseases on world kidney day 2024 ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Kidney Day 2024: किडनीचे गंभीर आजार टाळण्यासाठी या सवयी अंगीकारा!

World Kidney Day 2024: किडनीचे गंभीर आजार टाळण्यासाठी या सवयी अंगीकारा!

Mar 14, 2024 09:12 AM IST

Healthy Kidney: जागतिक किडनी दिन दरवर्षी मार्चच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो, जो यावेळी १४ मार्च रोजी साजरा केला जाईल.

how to keep kidney healthy
how to keep kidney healthy (Freepik)

Lifestyle News in Marathi: शरीर उत्तमरीत्या चालण्यासाठी सगळेच अवयव योग्य चालणे गरजेचे आहे. एक महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी आपल्या शरीराला संतुलित (Health Care Tips) ठेवते. किडनीचे काम फक्त लघवी तयार करणेच नाही तर ते रक्तदाब नियंत्रित ठेवते, लाल रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करते, हाडे निरोगी ठेवते, रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास मदत करते. ही सर्व कामे सुरळीत चालण्यासाठी किडनी निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर किडनीचे आजार होतात. किडनीचा आजार हा सायलेंट किलरसारखा असतो, जो पटकन लक्षात येत नाही. परंतु नियमित चेकअप करून घेतल्यास त्यात येणाऱ्या समस्या वेळेत ओळखल्या जाऊ शकतात. मात्र, काही सवयी लावून तुम्ही तुमची किडनी दीर्घकाळ निरोगी ठेवू शकता.

निरोगी आहार गरजेचा

सकस आणि संतुलित आहार फार महत्त्वाचा आहे. असा आजार घेतल्याने शरीराला आवश्यक पोषण तर मिळतेच शिवाय रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयविकार इत्यादी अनेक आजारांचा धोकाही टळतो. आहारात मिठाचे प्रमाण कमी करा. दिवसाला ५ ते ६ ग्रॅम मीठ शरीरासाठी पुरेसे आहे. जेवणात वरून अजिबात मीठ घेऊ नकात.

World Kidney Day 2024: निरोगी मूत्रपिंडासाठी ही ५ फळं आहेत सर्वोत्तम

पेनकिलर टाळा

किरकोळ समस्यांसाठी डॉक्टरांकडे न जात अनेकजण स्वतःहून पेनकिलर घेतात. पण लक्षात घ्या ही चांगली सवय नाही. याचा किडनीवर खूप वाईट परिणाम होतो आणि जर तुम्ही आधीच किडनीच्या समस्येने त्रस्त असाल तर हे अजिबात करू नका.

शरीर ऍक्टिव्ह ठेवा

रोज व्यायाम करावा. यामुळे फक्त शरीर तंदुरुस्त राहत नाही तर वजनही नियंत्रणात राहते. त्यामुळे किडनीच्या तीव्र आजाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. कार्डिओ, सायकलिंग, धावणे, योगासने, झुंबा असे सर्व प्रकारचे व्यायाम शरीरासाठी फायदेशीर आहेत.

Walnut Benefits: अक्रोड आरोग्यासाठी आहे वरदान, जाणून घ्या फायदे!

भरपूर पाणी प्या

दिवसातून ८ ग्लास पाणी पिणे फार महत्वाचे आहे. हवामान, तुमची आरोग्य स्थिती, गर्भधारणा आणि स्तनपान यासारख्या अनेक गोष्टींसाठी पाण्याचे प्रमाण आवश्यक असते. पण कोल्ड्रिंक्स, सोडा यांसारख्या गोष्टी जास्त पिण्याची चूक करू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)