Chanakya Niti: चाणक्य नीतीमध्ये प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आचार्य चाणक्य यांनी लिहलेल्या प्रत्येक धोरण आजही तेवढचं जीवनासाठी उपयुक्त आहे. या कारणांमुळे अनेक शतके उलटून गेली तरी आचार्य चाणक्य यांनी लिहलेल्या नीतिशास्त्राचे महत्त्व कमी झालेले नाही. आजही लोक चाणक्य नीतीला फॉलो करतात त्याचा अभ्यास करतात. नितीशास्त्रात जीवनाच्या अनेक पैलूंचे तपशीलवार वर्णन केले आहे. आचार्य चाणक्याने नीतीमध्ये यश मिळवण्याची अनेक सूत्रेही सांगितली आहेत. या सूत्रांचा अवलंब करतो, त्याला यश मिळवण्यासाठी कोणी रोखू शकत नाही.
यश आणि अपयश हे कोणत्याही कामात येऊ शकते. फक्त अपयश येईल म्हणून कोणतेही काम सुरू करायचं नाही किंवा काम अर्धवट सोडायचं असं अजिबात करू नकात. लक्षात ठेवा जो नेहमी आपले काम प्रामाणिकपणे करतो तो जिंकतो.
चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीला संधी मिळाल्यावर त्याने आपली प्रतिभा दाखवण्यास चुकवू नये. संधी आल्यावर जे आळशीपणा करतात त्यांना आयुष्यभर पश्चाताप होतो. एखाद्या व्यक्तीने कोणत्याही संधीसाठी नेहमीच तयार असले पाहिजे. जो व्यक्ती या गोष्टी लक्षात ठेवतो त्याला आयुष्यात कधीही अपयश येत नाही आणि यश आवर्जून मिळते.
आचार्य चाणक्य यांच्या मते, खोटे बोलणाऱ्याची नेहमी बदनामी होते. खोटे बोलणे किंवा बोलेले कोणालाही आवडत नाही. असे लोक खोटे बोलून काही दिवस आपले काम नक्कीच करून घेतात, पण एक ना एक दिवस ते पकडले जातात. खरे बोलणाऱ्याला यश उशिरा मिळते, पण त्याला ते नक्कीच मिळते. अशा लोकांना समाजात खूप मानसन्मान मिळतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीने आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यात कधीही संकोच करू नये. संकोच करणारे लोक कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. कारण संकोच करणाऱ्या लोकांना ज्ञान मिळत नाही आणि ते आयुष्यभर अज्ञानी राहतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा क्रोध. रागाच्या भरात माणसाची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती पूर्णपणे नष्ट होते. त्यामुळे माणसाने नेहमी रागापासून अंतर राखले पाहिजे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)