Aditi Wedding Look: अदिती आणि सिद्धार्थने गुपचूप बांधली लग्नगाठ, वधूचा साधा लूक होतोय व्हायरल-aditi rao hydari and siddharth marriage wedding pics aditi bridal look goes viral ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Aditi Wedding Look: अदिती आणि सिद्धार्थने गुपचूप बांधली लग्नगाठ, वधूचा साधा लूक होतोय व्हायरल

Aditi Wedding Look: अदिती आणि सिद्धार्थने गुपचूप बांधली लग्नगाठ, वधूचा साधा लूक होतोय व्हायरल

Sep 16, 2024 09:24 PM IST

Aditi Siddharth Marriage: बॉलिवूड स्टार कपल अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ विवाहबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही खुशखबर दिली आहे. दरम्यान, आदितीच्या ब्राइडल लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अदितीच्या या साध्या लूकचं सर्वजण कौतुक करत असून तो चांगलाच व्हायरल होत आहे.

Aditi Siddharth Marriage: अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थचे लग्न
Aditi Siddharth Marriage: अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थचे लग्न (Instagram)

Bridal Look of Aditi Roa Hydari: तब्बल तीन वर्षे डेट केल्यानंतर बॉलिवूडची स्टार कपल अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने अखेर लग्न केले आहे. दोघांनी नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अचानक झालेल्या लग्नाने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला असला तरी या दोघांच्या जोडीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. त्यांनी आपल्या लग्नासाठी ४०० वर्षे जुने श्रीरंगपूर मंदिर निवडले. अत्यंत इंटिमेट, सिंपल आणि साध्या पद्धतीने दोघांनी लग्न केले. दरम्यान, आदितीचा साधा ब्राइडल लूकही चाहत्यांना खूप आवडत आहे. चला तर मग पाहूया अदितीच्या ब्राइडल लूकबद्दल काही खास गोष्टी.

साध्या स्टाईलमध्ये अदिती खूपच छान दिसत आहे

अदिति का ब्राइडल लुक
अदिति का ब्राइडल लुक (Instagram)

अदिती आणि सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो समोर येताच खूप व्हायरल होत आहेत. दरम्यान अदितीचा ब्राइडल लूकही चांगलाच चर्चेत आहे. साधेपणाने भरलेल्या सिंपल ब्राइडल लूकमध्ये अदिती खूपच क्यूट दिसत आहे. अदितीने आपल्या ब्राइडल लूकसाठी बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा हटके एक साधा लूक निवडला आहे. या खास दिवशी तिने झरी आणि सिक्विन वर्कसोबत लाइट लेहंगा निवडला आहे. अदितीचा हा सुंदर लेहंगा टिपिकल साऊथ इंडियन ब्राइडला टक्कर देत आहे.

गोल्ड ज्वेलरीमध्ये दिसली शाही ब्राईड

अदितीने आपला ब्राइडल लुक पूर्ण करण्यासाठी सोन्याचे दागिने निवडले आहेत. हे अगदी शाही आणि पारंपारिक दिसते. तिने कानात गोल्डन इयररिंग्स, स्टेटमेंट नेकलेस, पायल आणि हातात गोल्डन कंगण आणि बांगड्या घातल्या आहेत. यासोबतच केसांना गजरा लावून ती खूपच क्यूट दिसत आहे.

मेकअपमध्येही दिसला साधेपणा

अदितीने या खास दिवसासाठी मेकअप अतिशय साधा ठेवला आहे. नववधूंना या दिवशी हेवी मेकअप करायला आवडत असला तरी आदितीची ही साधी स्टाईल पाहून सर्व जण तिचे कौतुक करत आहेत. तिने 'नो मेकअप' मेकअप लूक निवडला आहे. लाइट मेकअप बेस, शिमरी शटल आइज आणि न्यूड लिप्सनी तिने आपला एकूण मेकअप लूकला कम्प्लीट केले. यासोबतच कपाळावर एक छोटीशी टिकली आणि हातावर चंद्राच्या आकाराचा लावलेला आलता तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

 

 

Whats_app_banner
विभाग