Things For Hair Growth: अनेक लोकांना केस गळण्याची समस्या असते. फक्त केस तुटत नाही तर केसही वाढत नाहीत. तर ही एक गोष्ट घरी बनवून तुम्ही हेअर ग्रोथ सहज वाढवू शकता तसेच केस गळती देखील रोखू शकता. मात्र हे लक्षात ठेवा की, कोणत्याही केमिकल शॅम्पूमध्ये न मिसळता बेबी शॅम्पूमध्ये मिक्स करावे. कारण बेबी शॅम्पूमध्ये रसायने कमी असतात आणि ती अगदी सौम्य असते. ज्यामुळे केसांची तेलकट घाण साफ होईल आणि या मिश्रणाचे पोषण होईल. चला तर मग जाणून घेऊया केसांना कोणती गोष्ट लावल्याने होईल हेअर ग्रोथ
केस गळतीने त्रस्त असाल तर या गोष्टी मिसळून अर्क तयार करा. नंतर हे मिश्रण शॅम्पूमध्ये मिसळून केसांना लावा. काही वापरानंतर केस गळती थांबेल, नवीन वाढ होईल आणि केसही वेगाने वाढतील.
अँटी हेअर फॉल शॅम्पू बनवण्यासाठी या गोष्टींची गरज आहे -
- एक कांदा
- एक चमचा तांदूळ
- एक चमचा लवंग
- दोन तमालपत्र
- एक कप पाणी
एका कढईत एक कप पाणी टाकून त्यात कांद्याचे तुकडे घालावेत. तसेच तांदूळ, लवंग आणि तमालपत्र घालून सुमारे दहा मिनिटे शिजवावे. दहा मिनिटांनी हे मिश्रण झाकून थंड होऊ द्यावे. ज्यामुळे कांदा, लवंग, तमालपत्र हे सर्व घटक पाण्यात विरघळतील. आता हे पाणी गाळून घ्या.
या मिश्रणात एक चमचा कॉफी पावडर घाला. चांगले मिक्स करा आणि बेबी शॅम्पूमध्ये मिक्स करा. आता आठवड्यातून दोन दिवस या खास शॅम्पूने केस धुवा. यामुळे तुमचे केस गळण्यापासून वाचतील आणि नवी वाढ होईल. खरं तर कांद्यामध्ये असलेले सल्फर केसगळती रोखते, तर तमालपत्र आणि लवंग केसांमधील कोणत्याही प्रकारची बुरशी आणि बॅक्टेरियापासून संरक्षण करतात. त्याच बरोबर तांदूळ केस लांब, दाट आणि चमकदार बनविण्यास मदत करतो. तर कॉफीचा वापर रंगाबरोबरच टाळूतील रक्ताभिसरण वाढविण्यासाठीही केला जातो. ज्यामुळे हेअर ग्रोथ वाढते. त्यामुळे फक्त या सर्व गोष्टी मिसळून केसांना लावा आणि दुप्पट वेगाने वाढवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)