Summer Drinks for Gut Health and Digestion: उन्हाळा सुरू होताच लोक विविध प्रकारची थंड पेये पिण्यास सुरुवात करतात. परंतु हे पेय शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढवतात आणि शरीराला कोणताही फायदा देत नाहीत. तुम्हाला तुमचे शरीराला थंडावा द्यायचा असेल तर तुमची आपली पचनक्रिया सुधारा. पचन फास्ट करण्यासाठी आतड्याचे आरोग्य चांगले असणे आणि आतड्याच्या आरोग्यामध्ये चांगले बॅक्टेरिया विकसित करणे महत्वाचे आहे. यासाठी हे ड्रिंक्स तुमच्या आहारात समाविष्ट करा. ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत राहते आणि शरीरात कोणतीही समस्या उद्भवत नाही.
कोंबूचा हे फर्मेंटेड टी आहे. हे आतड्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. आंबट गोड असलेले हे ड्रिंक अनेक फ्लेवर्समध्ये तयार करता येते. उन्हाळ्यात प्यायल्यास पचनशक्ती तर सुधारतेच शिवाय वजनही कमी होते. शिवाय यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असल्याने अनेक आजारांपासूनही बचाव होतो.
भाजलेल्या हरभऱ्याच्या पावडर किंवा पीठापासून तयार केलेले थंड ड्रिंक केवळ शरीराला थंडावा देत नाही तर प्रथिनांनी भरपूर असण्यासोबतच पचनक्रिया सुधारते. सत्तूचे पेय सकाळी सेवन केल्यास वजन कमी होण्यासही मदत होते.
आले आणि लिंबू मिसळून तयार केलेले हे थंड ड्रिंक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. हे पेय पोटातील जडपणा आणि अॅसिडिटी दूर करण्यास मदत करते. उन्हाळ्यात जिंजर लेमन आइस टी आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
जर तुम्हाला उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून तुमच्या शरीराला थंडावा द्यायचा असेल आणि तुमच्या इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखायचे असेल, तर नारळ पाणी पिणे महत्त्वाचे आहे. हे केवळ शरीराला हायड्रेट करत नाही तर पचन देखील सुधारते.
उन्हाळ्यात पोटाची उष्णता दूर करण्यासाठी आणि पचनक्रिया जलद होण्यासाठी दररोज एलोवेरा ज्यूसमध्ये लिंबाचा रस मिक्स करून प्या. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यात चवीसाठी थोडे मध देखील मिक्स करू शकता. हे पेय उन्हाळ्यात पचनशक्ती वाढवण्यास मदत करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या