Hair Fall Remedies: हेअर फॉल वाढले का? मुक्ती मिळवण्यासाठी रुटीनमध्ये समाविष्ट करा हे मास्क आणि ड्रिंक
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Fall Remedies: हेअर फॉल वाढले का? मुक्ती मिळवण्यासाठी रुटीनमध्ये समाविष्ट करा हे मास्क आणि ड्रिंक

Hair Fall Remedies: हेअर फॉल वाढले का? मुक्ती मिळवण्यासाठी रुटीनमध्ये समाविष्ट करा हे मास्क आणि ड्रिंक

Jul 30, 2024 12:28 PM IST

Hair Care Tips in Marathi: केस गळण्याची समस्या वाढली असेल तर फक्त बाहेरून काळजी घेऊन उपयोग नाही. त्यासाठी आतून काळजी घेणे आवश्यक आहे. केस गळणे कमी करण्यासाठी तुम्ही हेअर मास्क आणि ड्रिंकचा आपल्या रुटीनमध्ये समावेश करू शकता.

हेअर फॉल टाळण्यासाठी मास्क आणि ड्रिंक
हेअर फॉल टाळण्यासाठी मास्क आणि ड्रिंक

Hair Mask and Drink for Hair Fall: केस गळण्याच्या समस्येने बहुतेक लोक त्रस्त असतात. हेअर फॉल कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू वापरतात. पण केवळ शॅम्पू वापरणे पुरेसा नाही. केसांची चांगली काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. तथापि, वरवरच्या काळजीसोबतच आतून काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही घरगुती हेअर मास्क लावण्यासोबत या ड्रिंकचे सेवन करू शकता. केस गळणे कमी करण्यासाठी घरच्या घरी हेअर मास्क कसा बनवावा आणि हेअर फॉलसाठी बेस्ट ड्रिंक कसे बनवावे हे येथे जाणून घ्या.

केस गळती रोखण्यासाठी लावा हा हेअर मास्क

हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- अर्धा कप रात्रभर भिजवलेले मेथी दाणे

- २५-३० कढीपत्ता

- १ मध्यम आकाराचा कांदा

कसे बनवावे

हा हेअर मास्क बनवण्यासाठी अर्धा कप रात्रभर भिजवलेले मेथी दाणे आणि २५-३० कढीपत्ता घ्या. नंतर ते बारीक करून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. आता मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्या. कांद्याचा रस चाळणीने गाळून घ्या. नंतर मेथी दाणा आणि कढीपत्त्याच्या तयार केलेल्या पेस्टमध्ये कांद्याचा रस घालून चांगले मिक्स करा. आता ही पेस्ट केसांना लावा आणि साधारण ३० ते ४० मिनिटे राहू द्या. नंतर केस शॅम्पू आणि कंडिशनरने धुवा. दर आठवड्याला याची पुनरावृत्ती करा.

हेअर फॉलसाठी बनवा ड्रिंक

हे ड्रिंक पेय बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- २ मध्यम आकाराचे गाजर

- १ इंच आल्याचा तुकडा

- १-२ आवळा

- मूठभर कढीपत्ता

- गरजेनुसार पाणी

कसे बनवावे

हे ज्यूस तयार करण्यासाठी सर्व गोष्टी नीट धुवून घ्या. गाजर आणि आलं सोलून घ्या. नंतर गाजर, आले आणि आवळा यांचे लहान तुकडे करून घ्या. आता ब्लेंडरमध्ये चिरलेले गाजर, आले, आवळा आणि कढीपत्ता घाला. त्यात थोड्या प्रमाणात पाणी घालावे. नंतर गुळगुळीत होईपर्यंत ब्लेंड करा. मिश्रण जास्त घट्ट असेल तर त्यात थोडे पाणी घालावे. आता गाळणी किंवा चीजक्लॉथ वापरून हे गाळून घ्या. एका ग्लासमध्ये रस टाकून प्या. आठवड्यातून २-३ वेळा हे ड्रिंक प्या.

ड्रिंकचे फायदे

- गाजरमध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए आणि ई भरपूर प्रमाणात असते. हे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन ए सीबमच्या उत्पादनास मदत करते, जे टाळू हायड्रेटेड ठेवते.

- आल्यामध्ये जिंजरॉल असते, जे टाळूमध्ये रक्त प्रवाह सुधारते. ज्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते. यात अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म देखील आहेत जे टाळूच्या आरोग्यास मदत करू शकतात.

- आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे केसांचे रोम मजबूत करते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहित करते. अकाली केस पांढरे होण्याची समस्या आणि कोंडा देखील टाळतो.

- कढीपत्त्यात अँटीऑक्सिडंट्स, अमिनो अॅसिड आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. हे केस मजबूत करण्यास आणि केसगळती रोखण्यास मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner