Foods to Reduce Joint Pain: थंडीचा जोर वाढू लागला की सांधेदुखीच्या रुग्णांना त्रास होतो. थंड वाऱ्यामुळे त्यांच्या सांध्यातील वेदना खूप वाढतात. ज्यावर कोणतेही तेल किंवा औषध लवकर प्रभाव दाखवत नाही. अशा परिस्थितीत सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी काय करावे? अनेक पोषणतज्ञ संधिवाताच्या वेदना कमी करण्यासाठी काही पदार्थांची शिफारस करतात. हे काही पदार्थ रोजच्या आहारात घेतल्यास सांध्यातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. हे पदार्थ कोणते आहेत ते जाणून घ्या आणि आहारात समावेश करायला विसरू नका.
मूठभर नट्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स सांध्यांना ल्युब्रिकेट्स पुरवतात. त्यामुळे हाडांचा आकार खराब होत नाही आणि त्याचबरोबर हाडे मजबूत राहतात. ज्याचे कारण म्हणजे त्यात असलेली अनेक खनिजे. त्यामुळे रोज बिस्किटे किंवा स्नॅक्स खाण्याऐवजी मूठभर काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड यांचा आहारात समावेश करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आहारात भाजलेले हरभरे म्हणजे फुटाणे आणि शेंगदाणे देखील समाविष्ट करू शकता.
जुन्या काळी अनेक घरांमध्ये जेवणासोबत कोणत्या ना कोणत्या प्रकारची चटणी नक्कीच खाल्ली जायची. जवस, तीळ किंवा शेंगदाण्याची चटणी जुन्या पारंपरिक पद्धतीने घरी बनवली जाते. ही चटणी जेवणाची चव तर वाढवतेच पण हेल्दी फूडसाठीही उत्तम पर्याय आहे. तीळ किंवा फ्लेक्ससीड चटणीद्वारे हे आरोग्यदायी पदार्थ शरीरात प्रवेश करतात आणि हेल्दी फॅट वाढवतात. यामध्ये लसणाचाही वापर केला जातो. जे सांधेदुखी आणि सूज कमी करून आराम देते.
व्हिटॅमिन डीचे शोषण वाढवण्यासाठी दूध आणि दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे शरीरात कॅल्शियमचे पुरेसे प्रमाण वाढते आणि सांधेदुखीमुळे होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. याचे नियमित सेवन केले पाहिजे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या