मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Iron Deficiency: लोहाची कमतरता दूर करण्यासाठी बीटरूट, डाळिंब नाही तर खा हे पदार्थ, होईल फायदा

Iron Deficiency: लोहाची कमतरता दूर करण्यासाठी बीटरूट, डाळिंब नाही तर खा हे पदार्थ, होईल फायदा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Nov 21, 2023 11:44 AM IST

Healthy Eating Tips: महिलांच्या शरीरात लोहाचे पुरेसे प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे. १९ ते ५० वयोगटातील महिलांना दररोज सुमारे १८ मिलीग्राम लोह आवश्यक असते. लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हे पदार्थ खा.

लोहाची कमतरता दूर करण्यासाठी फूड
लोहाची कमतरता दूर करण्यासाठी फूड (freepik)

Foods for Iron Deficiency: शरीराला प्रथिने आणि जीवनसत्त्वांप्रमाणेच लोहाचीही गरज असते. जेणेकरून शरीर संसर्गाशी लढू शकेल. हिमोग्लोबिनसाठी लोह खूप महत्वाचे आहे. लोहाच्या मदतीने शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. शिवाय स्नायूंच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी देखील हे महत्वाचे आहे. परंतु बहुतांश स्त्रिया लोहाच्या कमतरतेने ग्रस्त असतात आणि पुरेशा प्रमाणात पोषक तत्त्वे न मिळाल्याने अॅनिमियाच्या बळी होतात. शरीरात लोहाची कमतरता असल्यास डाळिंब किंवा बीटरूट खाण्याऐवजी ही फळे आणि पदार्थ खा. लोहाचे प्रमाण वाढू लागेल.

ट्रेंडिंग न्यूज

वाटाणा

वटाणा म्हणजे मटार किंवा सुक्या मटारमध्ये लोहाचे प्रमाण १०० ग्रॅममध्ये १.५ मिलीग्राम असते. वाटाणे दररोज पुरेशा प्रमाणात खाल्ले तर दैनंदिन गरजेनुसार लोह उपलब्ध होईल. मटार व्यतिरिक्त सोयाबीन आणि राजमामध्ये देखील लोह आढळते.

खजूर, आलूबुखारा, अंजीर, मनुका

लोहाच्या कमतरतेमुळे एनिमियाचा धोका असतो. अशा परिस्थितीत लोहयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे. खजूर, आलूबुखारा, अंजीर आणि मनुका हे लोहयुक्त पदार्थ आहेत. आलूबुखारा म्हणजे प्लममध्ये लोहाचे प्रमाण जास्त नसले तरी त्यात असलेले व्हिटॅमिन सी शरीराला पुरेसे लोह शोषण्यास मदत करते. अंजीरमध्ये पुरेशा प्रमाणात लोह असते. अंजीरमध्ये २९.४९ मिलीग्राम लोह असते. दररोज एक ते दोन अंजीर दैनंदिन लोहाची गरज पूर्ण करू शकतात.

काजू

शरीरात लोहाची कमतरता असल्यास रोज काजू खाणे हा उत्तम पर्याय आहे. काजू खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका नसतो. परंतु प्रति १०० ग्रॅम काजूमध्ये लोहाचे प्रमाण सुमारे ६.६८ मिलीग्राम असते.

 

काळे तीळ

आयुर्वेदानुसार काळ्या तीळात पांढऱ्या तिळापेक्षा जास्त लोह असते. दररोज थोड्या प्रमाणात काळे तीळ खाल्ल्याने पुरेसे लोह मिळू शकते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel