Natural Glow on Face: चेहऱ्यावरील चमक हे बऱ्याचदा निरोगी त्वचेचे सूचक असते. पण निरोगी त्वचेसोबतच स्किन केअरची सुद्धा गरज असते. त्वचा निरोगी असेल तर त्याची योग्य काळजी घेऊन ती आणखी सुंदर बनवता येते. स्किन केअर रुटीन योग्य असेल तर त्वचा सुद्धा चांगली राहते. दररोज नियमितपणे स्किन केअर खूप महत्त्वाचे आहे. त्वेचेची बाहेरून काळजी घेण्यासोबतच त्वचेला आतून पोषण देण्यास विसरू नका. यामुळे तुम्ही नैसर्गिकरित्या ग्लो करा आणि सुंदर दिसाल. तुमच्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक कायम ठेवण्यासाठी हे मार्ग पाहा.
त्वचेला हायड्रेशन प्रदान करण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. जेणेकरून त्वचा आतून हायड्रेट राहते. त्वचेतील हायड्रेशनमुळे त्वचा प्लम्पी आणि रेडिएंट दिसते. त्यामुळे नैसर्गिक चमक दिसून येते.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. तर ड्राय फ्रूट्स नैसर्गिक फॅट प्रदान करतात. त्यामुळे त्वचेला संरक्षण मिळते आणि हेल्दी ग्लो मिळते.
आतील त्वचा निरोगी बनवण्यासाठी हेल्दी डायट आणि हायड्रेशन जसे आवश्यक आहे तसेच त्वचा बाहेरून सुंदर बनवण्यासाठी स्किन केअर सुद्धा महत्त्वाचे आहे. तुमच्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंगचा समावेश करा. तसेच तुमच्या त्वचेच्या प्रकाराची विशेष काळजी घ्या. जेणेकरून आपल्याला योग्य पोषण मिळू शकेल.
स्किन केअरसोबतच डेड स्किन काढणे सुद्धा महत्त्वाचे आहे. एक्सफोलिएशनमुळे छिद्रे उघडतात आणि स्किन प्रोडक्ट शोषण्यास मदत होते. महिन्यातून एकदा किंवा दोनदा स्क्रब करता येतो. यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता.
दररोज हलक्या चेहऱ्याची मालिश करणे आवश्यक आहे. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचेला हेल्दी ग्लो येते. मसाजसाठी फेस रोलर किंवा बोटांची मदत घेतली जाऊ शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)