Anti Wrinkle Foods: वाढत्या वयाबरोबर तुमची त्वचा तरुण आणि रिंकल फ्री ठेवायची असेल, तर तुमच्या आहारात अँटी एजिंग गुण असलेल्या या पदार्थांचा समावेश करा. आपण खात असलेल्या पौष्टिक पदार्थांचा प्रभाव फक्त आपल्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवर सुद्धा होतो. पोषण आणि हेअर अँड स्किन केअर तज्ञ किरण कुकरेजा यांनी तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि अशा ५ अँटी-एजिंग फूड्सबद्दल सांगितले आहे. या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करुन तुम्ही तुमची त्वचा तरुण ठेवू शकता. हे पदार्थ कोणते आहेत ते जाणून घ्या.
डल स्किन आणि एजिंग इफेक्ट दूर करण्यासाठी पपई अत्यंत प्रभावी मानली जाते. पपई हे अँटी एजिंग फूड आहे. त्याचा आहारात समावेश करून तुम्ही तुमची त्वचा दीर्घकाळ तरूण ठेवू शकता. पपईमध्ये पपईन, व्हिटॅमिन सी, फोलेट, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर आणि व्हिटॅमिन के चांगल्या प्रमाणात असते, जे त्वचेचे आरोग्य सुधारून सुरकुत्या दूर ठेवण्यास मदत करते.
भोपळ्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि झिंकसारखे घटक असतात, जे त्वचेशी संबंधित पिंपल्स, डाग, डार्क सर्कल, सुरकुत्या इत्यादी समस्या दूर करतात. भोपळ्यामध्ये असलेले एन्झाईम्स आणि अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतात आणि त्वचा स्वच्छ आणि मुलायम बनवतात. हे फाइन लाइन आणि सुरकुत्या कमी करतात.
वाढत्या वयाचे परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही व्हेजिटेबल ज्यूसची मदत घेऊ शकता. भाज्यांच्या ज्यूसशिवाय अनेकांना व्हीटग्रास ज्यूस पिणे आवडते. टेस्टी असण्यासोबत हे ज्यूस त्याच्या अँटी एजिंग गुणधर्मांसाठी ओळखला जातो. व्हीटग्रासमध्ये असलेल्या क्लोरोफिलमध्ये शक्तिशाली अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे सूज आणि जळजळशी लढण्यास मदत करतात आणि वृद्धत्वाच्या आजारांपासून संरक्षण करतात.
नारळाच्या पाण्यात सायटोकिनिन नावाचे संयुग असते, ज्यामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. नारळाच्या पाण्यात असलेले व्हिटॅमिन सी त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यात अनेक अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे नैसर्गिकरित्या कोलेजन संश्लेषण उत्तेजित करतात. नारळाचे पाणी त्वचेची लवचिकता सुधारून मऊ ठेवण्यास मदत करू शकते.
फ्लेक्स सीड्समध्ये असलेले ओमेगा-३ शरीरात कोलेजन तयार करण्यास, सुरकुत्या आणि अकाली वृद्धत्व यांसारखी लक्षणे कमी करण्यास मदत करते.
सल्ला- हे सर्व अँटी एजिंग फूड अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत करतात. पण सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी व्यक्तीचा संतुलित आहार, उन्हापासून संरक्षण आणि आरोग्यदायी जीवनशैलीही महत्त्वाची भूमिका बजावते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)