Herbal Drink for Digestion: बहुतेक लोकांना जेवण केल्यानंतर पोटात जडपणा जाणवतो. ब्लॉटिंग आणि अन्न पचण्यात अडचण या समस्यांचा अनेकांना त्रास होतो. पचनाच्या समस्येवर मात करण्यासाठी बहुतेक लोक अँटासिड्ससारखी औषधे घेतात. पण हा कायमस्वरूपी उपाय नाही. जर तुम्हाला ब्लॉटिंग, जडपणा आणि अपचनाची समस्या दररोज होऊ नये असे वाटत असेल, तर स्वस्त उपाय म्हणजे घरीच हर्बल ड्रिंक प्या. हे हर्बल ड्रिंक प्यायल्याने पचनाची समस्या कमी होते. जाणून घ्या पचनासाठी कोणते हर्बल ड्रिंक पिता येतात
जिऱ्यापासून बनवलेला चहा पचनाची समस्या कमी करू शकतो. जे लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांना जिऱ्याच्या पाण्याचा फायदा होऊ शकतो. जिरा वॉटर बनवण्यासाठी जिरे कोरडे भाजून पावडर बनवा. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा जिरे पावडर घाला आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. जेणेकरून त्याची चव रिफ्रेशिंग होईल. आता हे हर्बल ड्रिंक प्या. जिरे पाणी बद्धकोष्ठता आणि पोटफुगीपासून आराम देते. पण लक्षात ठेवा की जिऱ्याच्या पाण्यासोबतच दिवसभर पुरेसे पाणी प्या.
कॅमोमाइल टीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे हा चहा स्नायूंना आराम करण्यास मदत करतो. या चहामुळे अपचन आणि पोटातील जडपणा कमी होतो आणि अन्न पचण्यास मदत होते. गरम पाण्यात कॅमोमाइल टी बॅग भिजवून चहा बनवा आणि प्या. यामुळे शरीराला आराम मिळतो.
जे लोक जेवण केल्यानंतर अपचन, पोट फुगणे, ब्लॉटिंग यासारख्या समस्यांनी त्रस्त असतात त्यांना बडीशेपचा चहा प्यायल्याने फायदा होऊ शकतो. एक कप गरम पाण्यात एक चमचा बडीशेप घाला आणि एक मिनिट ठेवा. नंतर गाळून घ्या. बडीशेपचा चहा प्यायल्याने ताजेपणा तर येतोच शिवाय गॅस आणि खाल्ल्यानंतर होणाऱ्या अस्वस्थतेपासूनही आराम मिळतो.
आल्याचा चहा बहुतेक सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी वापरला जातो. पण त्याचवेळी आल्याचा चहा पित्ताचे उत्पादन वाढवतो, जे अन्न पचण्यास मदत करते. अर्ध्या ग्लास पाण्यात थोडे किसलेले आले मिसळा आणि सुमारे १५ मिनिटे उकळवा. हा चहा गाळून प्या.
पुदिन्याचा चहा ॲसिडीटी, गॅस, पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्यांवर खूप गुणकारी आहे. पुदिन्याची पाने गरम पाण्यात उकळून प्या. मिंट टी हे पोटाची जळजळ, अॅसिडिटी विशेषतः उन्हाळ्यात होणारी जळजळ यासाठी हे प्रभावी हर्बल ड्रिंक आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या