Cardiac Arrest: अभिनेता ऋतुराज सिंहचा कार्डियाक अरेस्टने झाला मृत्यू, जाणून घ्या कोणत्या लक्षणांकडे करू नये दुर्लक्ष-actor rituraj singh died due to cardiac arrest know which symptoms should never ignore ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cardiac Arrest: अभिनेता ऋतुराज सिंहचा कार्डियाक अरेस्टने झाला मृत्यू, जाणून घ्या कोणत्या लक्षणांकडे करू नये दुर्लक्ष

Cardiac Arrest: अभिनेता ऋतुराज सिंहचा कार्डियाक अरेस्टने झाला मृत्यू, जाणून घ्या कोणत्या लक्षणांकडे करू नये दुर्लक्ष

Feb 20, 2024 07:14 PM IST

Actor Rituraj Singh Died: अभिनेता ऋतुराज सिंह यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले आहे. कार्डियाक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. जाणून घ्या कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

अभिनेता ऋतुराज सिंहचे कार्डियाक अरेस्टने निधन, याचे लक्षणे
अभिनेता ऋतुराज सिंहचे कार्डियाक अरेस्टने निधन, याचे लक्षणे

Cardiac Arrest Symptoms: टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या मृत्यूचे कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय त्यांना पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडाशी संबंधित समस्याही होत्या. अभिनेता गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अभिनेता ऋतुराज यांच्या मृत्यूपूर्वी अनेक दिग्गजांच्या मृत्यूचे कारण कार्डियाक अरेस्ट हे होते. ही एक गंभीर समस्या आहे. मात्र शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष दिल्यास ही समस्या टाळता येऊ शकते. जाणून घ्या शरीरातील कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

कार्डियाक अरेस्टचे लक्षणं

१. हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा अस्वस्थता. ही वेदना किंवा अस्वस्थता सतत किंवा

मधून-मधून असू शकते. काही लोकांना चालताना किंवा चढताना वाढलेली अस्वस्थता किंवा वेदना जाणवू शकतात.

२. श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. हे लक्षण छातीत दुखण्याशिवाय उद्भवू शकते आणि आराम करताना किंवा शारीरिक हालचाली दरम्यान येऊ शकते. चालताना किंवा झोपताना श्वास घेण्यास त्रास होणे हे एक अतिशय महत्त्वाचे लक्षण आहे.

३. हृदयविकाराचा झटका आलेल्या काही व्यक्तींना मळमळ होऊ शकते किंवा अपचन सारखी लक्षणे जाणवू शकतात. ही लक्षणे

स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात.

४. जास्त घाम येणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते. हे लक्षण पुरुषांमध्ये जास्त दिसून येते.

५. लवकर थकवा येणे किंवा अशक्त वाटणे हे हृदयाच्या समस्येचे लक्षण असू शकते.

६. चक्कर येणे, बेशुद्ध होणे किंवा जवळजवळ जीव गेल्यासारखं वाटणे हे हृदयातील रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे होऊ शकते. या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

७. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही वेळा चिंता, भीती वाटणे हे लक्षण असू शकते. याकडे कधीच दुर्लक्ष करू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग