मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Care: 'हेल्थ ऑफ नेशन' अहवालानुसार 'हा' देश झाला आहे 'जगातील कर्करोगाची राजधानी'!

Health Care: 'हेल्थ ऑफ नेशन' अहवालानुसार 'हा' देश झाला आहे 'जगातील कर्करोगाची राजधानी'!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 08, 2024 06:09 PM IST

Cancer Capital of the World: कर्करोगाच्या वाढत्या घटना ही चिंताजनक बाब आहे.

Which country become Cancer Capital of the World
Which country become Cancer Capital of the World

Cancer Capital: अपोलो हॉस्पिटल्सने 'हेल्थ ऑफ नेशन' च्या प्रमुख वार्षिक अहवालाच्या नवीनतम आवृत्तीचे नुकतेच अनावरण केले. अहवालात कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांसह भारतातील असंसर्गजन्य रोग (एचसीडी) च्या वाढीवर प्रकाश टाकला आहे, या सर्वांचा देशाच्या एकूण आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो. विशेषत: जगाच्या तुलनेत भारतातील कर्करोगाच्या वाढत्या घटना ही चिंताजनक बाब आहे, ज्यामुळे भारत 'जगातील कर्करोगाची राजधानी' झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तज्ञांचे मत काय?

डॉ. प्रीथा रेड्डी, उपाध्यक्षा, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाल्या की,“आपल्या देशाच्या विकासात आरोग्याच्या महत्वाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आमच्या हेल्थ ऑफ नेशन अहवालाद्वारे, आम्ही असंसर्गजन्य रोगांच्या सतत वाढणाऱ्या ओझ्याकडे लक्ष वेधण्याचा आणि जागरुकता आणण्याची आशा करतो. तसेच आमचा असा ठाम विश्वास आहे की संपूर्ण आरोग्यसेवा इकोसिस्टीम आणि राष्ट्राने एकत्र येण्याची आणि एकसंध दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून आपण एनसीडीचा खऱ्या अर्थाने सामना करू शकू. आमच्या निष्कर्षातून असे समोर आले आहे की कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यासारख्या वाढत्या साथीच्या आजाराशी लढण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी आणि ते पलटवून लावण्यासाठी तत्काळ उपचारांची खूप गरज आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देऊन, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा उपायांना चालना देऊन आणि आरोग्यातील असमानता दूर करून शाश्वत विकासाचा मार्ग देखील मोकळा करू शकतो.”

भारतात झपाट्याने आर्थिक आणि जीवनशैलीत बदल होत असताना, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, श्वसनाचे आजार आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांमध्ये (एनसीडी) वाढ होत आहे, ज्याद्वारे देशातील एकूण मृत्यूंपैकी ६३% मृत्यू होतात. २०३० पर्यंत, या आजारांमुळे भारताला आर्थिक उत्पादनात ३.५५ ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसेल. तथापि, सक्रिय प्रतिबंधात्मक उपायांमुळे हा प्रभाव कमी होण्यात मदत होऊ शकेल. एनसीडीच्या वाढत्या ओझ्यापासून स्वत:चे, आपल्या कुटुंबांचे आणि आपल्या समुदायांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने कृती करणे महत्त्वाचे आहे. या आरोग्याच्या संकटाला कारणीभूत असलेल्या घटकांबद्दल जागरूकता वाढवणे आणि एनसीडीचा लोकांवरील वाढता प्रभाव दूर करण्यासाठी सक्रिय उपाय करणे, हा प्रो-हेल्थ रिस्क स्कोअरचा उद्देश आहे.

हेल्थ ऑफ नेशन २०२४ अहवालातील ठळक मुद्दे

१) भारतात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ आणि सरासरी वयात लक्षणीय घट झाली आहे.

२) भारतात स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्याचे सरासरी वय ५२ आहे, यूएसए आणि युरोपमध्ये ते ६३ आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी, निदानाचे सरासरी वय ५९ वर्षे आहे, तर पश्चिमेकडील सरासरी वय ७० वर्षे आहे.

३) कोलन कर्करोगाचे ३०% रुग्ण ५० वर्षांपेक्षाही कमी वयाचे आहेत.

४) भारतात कर्करोग तपासणीचे प्रमाण खूपच कमी आहे. भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या स्क्रीनिंगचे प्रमाण १.९% आहे, तर यूएसए मध्ये ८२%, यूकेमध्ये ७०% आणि चीनमध्ये २३% आहे. भारतामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी ०.९% आहे, यूएसएमध्ये ७३%, युकेमध्ये ७०% आणि चीनमध्ये ४३% आहे.

५) लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, लठ्ठपणा सर्व क्रॉनिक एनसीडीसाठी सर्वात सामान्य जोखीम घटक म्हणून देखील उदयास येत आहे.

६) लठ्ठपणाचे प्रमाण २०१६ मध्ये ९% होते, आता २०२३ मध्ये २०% पर्यंत वाढले आहे.

७) ९०% स्त्रिया आणि ८०% पुरुषांचे हिप रेशो हे प्रमाणापेक्षा जास्त.

८) ३ पैकी २ भारतीयांना उच्च दाबाचा त्रास आहे, तर ६६% प्री-हायपरटेन्सिव्ह अवस्थेत आहेत.

९) १० पैकी १ व्यक्तीला अनियंत्रित मधुमेह आहे आणि ३ पैकी १ प्री डायबेटिक आहे.

१0) भारतीयांना मोठ्या प्रमाणात ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियाचा धोका असतो.

११) पुरुषांना 'ओएसए' चा दुप्पट धोका (३०%) स्त्रियांपेक्षा (१५%) अधिक होता.

१२) तणावामुळे उच्च रक्तदाबाचा धोका १.५ पट वाढला.

१३) महिलांमध्ये मधुमेहाचा धोका २ पट आणि पुरुषांमध्ये ३ पट वाढला.

WhatsApp channel

विभाग