हिवाळा असो वा उन्हाळा, लोक बहुतेक खाद्यपदार्थ जास्त काळ टिकावेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात. फ्रिजच्या तापमानामुळे खाद्यपदार्थ खराब होण्यापासून वाचतात. पण तुम्हाला माहित आहे का काही पदार्थ हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही खराब होतात. हो तुम्ही बरोबर ऐकले. असे काही पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये जरी ठेवले तरी देखील खराब होतात. पण हे पदार्थ कोणते असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. चला जाणून घेऊया...
मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी कोणत्या १० गोष्टी फ्रीजमध्ये ठेवून नयेत याविषयी माहिती दिली आहे. हे १० पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फ्रेश राहण्याऐवजी लवकर खराब होऊ लागतात असे त्यांचे म्हणणे आहे. आता हे पदार्थ कोणते जाणून घ्या..
वाचा: चार धाम यात्रेला जाण्याचा विचार करत आहात? मग घरच्या घरी फिट आहात की नाही तपासून पाहा
ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्या लवकर खराब होतात. ब्रेडच्या पॅकेटवर दिलेल्या एक्सपायरी डेट पूर्वीच ते फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होऊ लागतात.
ही चूक बहुतेक लोक करतात. जास्त काळ टोमॅटो फ्रेश ठेवण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवतात. पण ही चूक तुम्ही करु नका. फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवल्यानंतर त्यांचा रंग बदलतो आणि चवही कमी होते.
वाचा: फाटलेले ओठ लवकर बरे करतील हे घरगुती उपाय, पुन्हा होतील मऊ आणि गुलाबी
मध हे कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका. ते फ्रीजमध्ये ठेवल्याने गोठते आणि त्याची चवही बदलते.
टरबूज बाहेर ठेवल्याने त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स टिकून राहतात. त्याचबरोबर ते फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा रंग आणि चव दोन्ही बदलते. त्यामुळे टरबूज नेहमी फ्रीजबाहेर ठेवावा.
बटाट्याचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हीही ते फ्रिजमध्ये ठेवत असाल तर थांबा आणि ही चूक पुन्हा करु नका. बटाट्यामध्ये असलेला स्टार्च थंड तापमानात साखरेत बदलतो. ज्यामुळे बटाट्याची चव गोड होते.
वाचा: गुडघेदुखीपासून आराम हवा? मग पंतप्रधान मोदींनी सांगितले पदहस्तासन नक्की करा
कांदा कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. कांदा फ्रीजमध्ये ठेवल्याने तो ओलावा लवकर शोषून घेतो. ज्यामुळे कांदा लवकर खराब होऊ लागतो.
लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याला मोड येतात. त्यामुळे तो कांदा खाण्यालायक राहात नाही.
केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांचा रंग, चव आणि पोत हे सर्व बिघडू लागते. तसेच ती लवकर काळी पडतात.
कॉफी फ्रिजमध्ये ठेवलेल्या बाकीच्या वस्तूंचा सुगंध आणि मॉइश्चरायझर शोषून घेते. त्यामुळे कॉफीची चव आणि सुगंध बिघडतो. फ्रीजमध्ये ठेवलेली कॉफी वापरल्यामुळे उग्रट वास येऊ लागतो.
ऑलिव्ह ऑईल फ्रिजमध्ये ठेवल्याने गोठू लागते. तसेच त्यामध्ये क्रिस्टल्स तयार होतात. त्यामुळे चुकूनही ऑलिव्ह ऑईज फ्रिजमध्ये ठेवू नका.
संबंधित बातम्या