Avoid Food Combinations In Marathi: दररोज सोशल मीडियावर फूड कॉम्बिनेशन्स व्हायरल होत असतात. लोक खाद्यपदार्थांवर विविध प्रयोग करत राहतात. एखादी गोष्ट एकत्र मिसळल्याने त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून न घेता लोक फूड कॉम्बिनेशनचा प्रयत्न करत राहतात. चुकीच्या फूड कॉम्बिनेशचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यामुळे पोट खराब तर होतेच पण अनेक आजारांचा धोकाही निर्माण होतो. आयुर्वेदानुसार, चुकीचे फूड कॉम्बिनेशन शरीरासाठी आहार विरोधी म्हणून काम करते. हे चुकीचे फूड कॉम्बिनेशन वारंवार खाल्ल्यास ते गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. बऱ्याच वेळा आपण त्या गोष्टी निरोगी मानून एकत्र खातो. तर त्यांचे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर नाही. आज आपण अशाच काही घातक फूड कॉम्बिनेशनबाबत जाणून घेणार आहोत.
दूध आणि मोड आलेले धान्य एकत्र खाऊ नयेत. स्प्राउट्स खाल्ल्यानंतर काही वेळातच दूध प्यायल्यास पचनास त्रास होऊ शकतो. स्प्राउट्समध्ये फायबर आणि प्रथिने जास्त असतात. ते खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्यास ते पचायला जड जाऊ शकते.
जर तुम्ही चिकनसोबत गुळापासून बनवलेले काहीही खाल्ले तर तुमचे वजन वाढू शकते. याशिवाय चिकन खाल्ल्यानंतरही गूळ खाणे हानिकारक आहे. त्यामुळे या कॉम्बिनेशन्सचे सेवन करू नका.
अनेकजण मिठाई बनवण्यासाठी तुपात मध मिसळतात. पण तुपामध्ये मध मिसळणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे पचनसंस्थेवरील भार वाढू शकतो. या गोष्टी मिसळून खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे हे फूड कॉम्बिनेशन टाळा.
चीज आणि मांस शरीरासाठी हानिकारक कॉम्बिनेशन आहे. चीज दुधापासून तयार केली जाते. जेव्हा ते मांसाबरोबर खाल्ले जाते तेव्हा ते हार्मोनल आरोग्यास हानी पोहोचवू शकते. यामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डर होण्याची शक्यता असते.
पांढऱ्या तीळापासून बनवलेले काहीही पालकासोबत खाल्ले तर तुमच्या शरीराला इजा होऊ शकते. तीळ आणि पालक दोन्ही पचनसंस्थेसाठी जड असतात. या गोष्टी एकत्र खाल्ल्यास शरीराला हानी पोहोचते. त्यामुळे पालकानंतर पांढऱ्या तिळापासून बनवलेले काहीही खाऊ नये. यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते.