Ayurvedic Remedy for Joint Pain: सांधेदुखीची समस्या हिवाळ्यात जास्त वाढते. गुडघे, कंबर, कोपर, हाताची आणि पायाची बोटे दुखण्याची समस्या जवळजवळ प्रत्येक वयोगटातील लोकांना त्रास देते. आयुर्वेदात सांधेदुखीचे कारण वात हे सांगितले आहे. वात म्हणजेच वायू वाढल्याने शरीरातील वेदना वाढतात. अशा परिस्थितीत आयुर्वेद तज्ज्ञ तन्मय गोस्वामी सांगतात की, सांधेदुखीची समस्या असेल तर या गोष्टी टाळणे गरजेचे आहे. लवकर आराम मिळवायचा असेल तर कोणत्या गोष्टी टाळाव्या हे जाणून घ्या.
आयुर्वेदानुसार मनातील चिंता शरीरात वात वाढवते. त्यामुळे शरीरातील वेदना वाढतात. अशा परिस्थितीत मानसिक तणाव दूर ठेवा.
रात्री पुरेशी झोप घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच सांधेदुखीच्या बाबतीत सुद्धा रात्री योग्य आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे.
दररोज सकाळी उठून मल आणि लघवीची वेळ निश्चित करा. या दैनंदिन कामात दिरंगाई करू नका. दररोज एकाच वेळी हे कार्य पूर्ण करा.
आयुर्वेदानुसार वात रोगांमध्ये शरीराचे दुखणे वाढते, तेथे विश्रांती आवश्यक आहे. शरीरात थकवा जाणवत असेल तर विश्रांती घ्या. तसेच प्रवास पूर्णपणे टाळा.
आयुर्वेदानुसार जेव्हा सांधेदुखीची समस्या तुम्हाला सतत त्रास देत असते, तेव्हा औषधांसोबत या काही पदार्थ टाळल्याने आराम मिळतो. हरभरा, वाटाणे, मध, बटाटे आणि टोमॅटो हे असे काही पदार्थ आहेत. ज्यामुळे शरीरातील वाताची समस्या वाढते. अशा परिस्थितीत या पदार्थांपासून दूर राहा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या