प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याला आयुष्यात कधीही गरिबीचा सामना करावा लागू नये. सगळेच नेहमी आपण धनवान असू असेच स्वप्न बघतात. पण खूप प्रयत्न करूनही तसे होत नाही. यासाठी नक्की काय करावे हे हे समजत नसेल तर चाणक्यांचं नीतिशास्त्र कामी येईल. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात असे अनेक धडे दिले आहेत जे एखाद्या व्यक्तीला अशा परिस्थितीत अडकण्यापासून वाचवू शकतात. चला जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी दिलेले ते धडे जे एखाद्या व्यक्तीला आर्थिक संकटातून वाचवू शकतात.
एखाद्या व्यक्तीवर वाईट काळाचा सामना करावा लागतो तेव्हा त्याला पैसे उपयोगी पडतो. अशा स्थितीत व्यक्तीने कधीही अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करू नये. कारण निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च करणाऱ्या व्यक्तीला भविष्यात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.
ज्या घरात अशांततेचे किंवा घाणीचे वातावरण असते, तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही. अशा परिस्थितीत लोकांनी या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या व्यक्तीला नेहमी बचत करण्याची सवय असते, अशा व्यक्तीला कधीही गरिबीचा सामना करावा लागत नाही. आपल्या कमाईतील काही भाग भविष्यासाठी नेहमी साठवून ठेवला पाहिजे.
कंजूष व्यक्तीलाही नेहमी पैशाची चिंता करावी लागते. अशा परिस्थितीत माणसाने कंजूष होण्याचे टाळले पाहिजे, अन्यथा भविष्यात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)