Kolhapuri Sukka Mutton Recipe in Marathi: कोल्हापूर म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात पहिल्यांदा येतो तो कोल्हापुरी तांबडा पांढरा आणि सुक्क मटण. खवय्यांना कोल्हापुरी मटणावर ताव मारायला प्रचंड आवडतो. अनेकजण हॉटेलमध्ये जाऊन मनसोक्त कोल्हापुरी सुक्क मटण खात असतात. परंतु अनेकांना घरी बनवण्याची खूप इच्छा असते. परंतु ते सोप्या रेसिपीच्या शोधात असतात. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी कोल्हापुरी सुक्क मटणाची रेसिपी सांगणार आहोत. यंदाच्या 31 डिसेंबरला तुम्ही कोल्हापुरी सुक्क मटण बनवून जल्लोषात हा दिवस साजरा करू शकता.
-1/2 किलो मटण
-4 कांदे
-2 गड्डे लसुण
-1 कप खोबरे
-3/4 कप तेल
-2 चमचे आले-लसुन पेस्ट
-2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
-1 चमचा काश्मिरी लाल तिखट
> कोल्हापुरी सुक्क मटण बनवण्यासाठी सर्वप्रथम मटण स्वच्छ करून त्यात हळद, मीठ आणि धने पावडर लावून अर्धा तास मॅरीनेट करण्यासाठी ठेवा.
>मटण मॅरीनेट करत असताना, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्या. आता यामध्ये दोन चमचे खोबरे, एक चमचा आले लसूण पेस्ट आणि थोडी कोथिंबीर घालून एकत्र करून घ्या.
> आता पातेल्यात दोन चमचे तेल टाकून गॅसवर ठेवा. त्यात बारीक चिरलेला कांदा छान सोनेरी रंगावर भाजून घ्या. आता त्यात आपण तयार केलेले वाटण घालून छान एकजीव करून घ्या.
>मासला भाजल्यानंतर त्यात मटण टाकून छान परतून घ्या. आता पातेल्यावर झाकण ठेवून त्यात पाणी टाका व झाकनातील पाणी लागेल तसे टाकून मटण शिजवून घ्या. कारण गरम पाण्यामुळे मटण चांगले शिजते आणि चवही छान येते.
>आता आपल्याला भाजलेले वाटण तयार करण्यासाठी दोन कांदे, चार चमचे खोबरे एक चमचा लसुन आणि आले हे सगळे थोड्या तेलावर भाजून घ्यावे लागेल. आणि मसाला छान बारीक वाटून घ्या.
>आता आपल्याला मटण फ्राय करण्यासाठी 1 कांदा परतून त्यात कांदा लसूण मसाला काश्मिरी लाल तिखट गरम मसाला धना जीरा पावडर टाका. भाजून केलेले वाटण दोन चमचे टाका आणि मटण टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
>मटण परतून झाल्यावर आळणी पाणी एक वाटी त्यात टाका आणि मटण आठ दहा मिनिट छान शिजवून घ्या. वरून कोथिंबीर टाकून सजवून घ्या.
संबंधित बातम्या