Social Media Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. रोज काही ना काही व्हायरल होत असतं. फूड कॉम्बिनेशनचे व्हिडीओ तर फार प्रसिद्ध आहेत. पण या खेरीज देसी जुगाडाचे (desi jugaad) व्हिडीओ पण प्रसिद्ध आहेत. एका अनोख्या स्टाईलमध्ये डायनिंग टेबलवर जेवतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे. या आयडियामुळे यूजर्सला त्या व्यक्तीच्या अनोख्या आयडियाचे कौतुक करायला भाग पाडले आहे. व्हिडीओमध्ये, इंस्टाग्राम युजर अब्दुल जलीलने जेवणाची भांडी ठेवण्यासाठी सायकलच्या टायरपासून (bicycle tyre dining table) बनवलेले विचित्र फिरणारे टेबल वापरताना दाखवले आहे. तुम्हालाही हे विचित्र वाटते का? व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा देसी जुगाड कसा आहे याबद्दल आम्हाला सांगा...
नुकतंच इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अब्दुल एका स्टूलवर आरामात बसलेला दिसत आहे. त्याच्यापुढे सॅलड, फिश करी, डाळ आणि उकडलेले अंडी यांसारखे विविध पदार्थ सायकलच्या टायरवर व्यवस्थित ठेवलेले आहेत. एका साध्या फिरकीने, तो त्याच्या आवडीच्या कोणत्याही डिशचा आनंद सहजतेने घेऊ शकतो. एक एक युनिक डायनिंग टेबल आहे. हे देसी जुगाड चे उदाहरण आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
४ लाखांहून अधिक लाईक्ससह, अनेक युजरने यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेक वापरकर्ते या जुगाडाचे कौतुक करत आहेत. अनेकांनी मजेदार कमेंटही केल्या. एका वापरकर्त्याने म्हटले की, "ही आयडिया भारताबाहेर जाऊ नये." दुसऱ्याने कमेंट केली, "भारत नवशिक्यांसाठी नाही." तिसरा म्हणाला: "छान कल्पना. कमी बजेट."
संबंधित बातम्या