महिलांसाठी खुशखबर! MTDC रिसॉर्टमध्ये मिळणार ५० टक्के सवलत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  महिलांसाठी खुशखबर! MTDC रिसॉर्टमध्ये मिळणार ५० टक्के सवलत

महिलांसाठी खुशखबर! MTDC रिसॉर्टमध्ये मिळणार ५० टक्के सवलत

Jan 03, 2024 11:06 AM IST

MTDC Resort: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला पर्यटकांना ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. ही सवलत १ ते ८ मार्च २०२४ या कालावधीत लागू असेल.

एमटीडीसी रिसॉर्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत
एमटीडीसी रिसॉर्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत (HT)

50% Discount for Women: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) महिला पर्यटकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे महिलांना महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला पर्यटकांसाठी ही खास ऑफर असून, १ ते ८ मार्च २०२४ या कालावधीत महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याची माहीत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी महिला पर्यटकांना महामंडळाची अधिकृत वेबसाइट www.mtdc.co यावर जाऊन बुकिंग करणे आवश्यक आहे. या ऑफरसाठी काही नियम आणि अटी आहेत. ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी वैध असून, त्यांना त्यांचे ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. महिला पर्यटक निवासात प्रवेश करताना (चेक-इनच्या) वेळी उपस्थित असणे अनिवार्य आहे. ही सवलत 1 ते 8 मार्च या कालावधीसाठी वैध असेल. ही ऑफर कॉन्फरन्स हॉल, लॉन्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम यांना लागू नाही. शिलाय यात नाश्त्याचा देखील समावेश नाही. या सवलती अंतर्गत बुकिंगची रक्कम रिफंडेबल आणि हस्तांतरणीय नाही. ही सवलत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही सवलतींसोबत जोडली जाऊ शकत नाही. एकावेळी केवळ एकाच सवलतीचा लाभ घेता येईल. या ऑफरमुळे महिला पर्यटकांना महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल.

ठकळ बाबी

- ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी वैध आहे.

- महिला पर्यटक चेक इनच्या वेळी उपस्थित असणे अनिवार्य आहे.

- ही सवलत १ ते ८ मार्च या कालावधीसाठी वैध असेल.

- ही सवलत कॉन्फरन्स हॉल, लॉन्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम यांना लागू नाही.

 

- सवलतीमध्ये नाश्त्याचा समावेश नाही.

- या सवलती अंतर्गत बुकिंगची रक्कम रिफंडेबल आणि हस्तांतरणीय नाही.

- ही सवलत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही सवलतींसोबत जोडली जाऊ शकत नाही.

Whats_app_banner