बेडरूम साफ करताना बेडवर पडलेली गादी साफ करणे हे सर्वात आव्हानात्मक काम असते. सहसा लोक बेडरूम साफ करताना बेडशीट बदलतात आणि गादीवरील धूळ झटकतात. यामुळे गादीवर पडलेली धूळ आणि घाण साफ तर होते पण बरेच दिवस वापरल्यामुळे गादीच्या आत गेलेली धूळ साफ करणे अवघड असते. अनेक वर्षे गादी वापरल्यामुळे तिच्यावर डाग पडलेले असतात. तसेच एक विचित्र वास यायला लागतो. अशावेळी लोक ती गादी फेकून देताता आणि नवी गादी आणतात. आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची जुनी गादी साफ करू शकता...
जुन्या गादीवर साचलेली धूळ साफ करण्यासाठी तुम्ही ओल्या-कापडाचा वापर करू शकता. यासाठी सुती कापड घ्यावे. आता हे कापड पाण्यात भिजवून चांगले पिळून घ्यावे. आता या ओल्या कापडाने गादी वरपासून खालपर्यंत नीट पुसून घ्या. यामुळे गादीवर साचलेली धुळीची माती चांगल्या प्रकारे स्वच्छ होईल. आता गादी थोडा वेळ सुकायला सोडा.
जुन्या गादीमध्ये धूळ साचल्याने त्याच्या आतून विचित्र दुर्गंधी येऊ लागते. गादीच्या आत वाढणाऱ्या जीवाणूंमुळे हा वास येतो. ही दुर्गंधी आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी गादी उन्हात ठेवावी. उन्हात ठेवल्याने त्यातील ओलावा संपतो आणि त्यातील सर्व जीवाणू मरतात. शक्य असल्यास गादी महिन्यातून एकदा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ठेवावी.
कडुनिंबाची पाने अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात. गादी जीवाणूमुक्त करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी कडुनिंबाची पाने पाण्यात टाकून रात्रभर ठेवावीत. सकाळी या पाण्यात कापड भिजवून गादी स्वच्छ करा आणि उन्हात वाळण्यासाठी ठेवा. यामुळे गादी पूर्णपणे जंतूमुक्त होईल आणि आतील घाणेरडा वासही संपुष्टात येईल. आपण गादीखाली कडुनिंबाची पाने देखील ठेवू शकता.
वाचा: महादेवाला आवडणारी 'ही' फुलं पाण्यात टाकून प्यायल्याने तुम्हलाही होईल मोठा फायदा! जाणून घ्या..
जुनी घाणेरडी गादी साफ करण्यासाठी आपण कॉस्टिक सोडा देखील वापरू शकता. गादीवर डाग असल्यास तो कॉस्टिक सोड्याच्या साहाय्याने ही काढून टाकता येतो. गादी स्वच्छ करण्यासाठी गादीवर कॉस्टिक सोडा शिंपडा. अर्धा तास असेच राहू द्या. त्यानंतर कोरड्या कापडाने स्वच्छ करावे. गादी पूर्णपणे स्वच्छ असेल. गादीवरील डाग दूर करण्यासाठी आपण कॉस्टिक सोड्यामध्ये लिंबाचा रस देखील घालू शकता.
संबंधित बातम्या