मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cervical Cancer ने झाले ३२ वर्षीय पूनम पांडेचे निधन, जाणून घ्या आजाराचे कारण आणि लक्षणे

Cervical Cancer ने झाले ३२ वर्षीय पूनम पांडेचे निधन, जाणून घ्या आजाराचे कारण आणि लक्षणे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 02, 2024 02:44 PM IST

Poonam Pandey Died: प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडेचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झाला आहे. या आजाराची कारणे आणि सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या.

पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन, आजाराचे कारण आणि लक्षणं
पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन, आजाराचे कारण आणि लक्षणं

Cause and Symptoms of Cervical Cancer: प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूचे कारण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असल्याचे सांगितले जात आहे. ती केवळ ३२ वर्षे होते. सर्व्हायकल कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे, जो भारतातील महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. या आजाराची कारणे आणि लक्षणे जाणून घ्या

काय आहे हा आजार?

सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्तनाच्या कर्करोगानंतरचा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. हा एक जीवघेणा आजार आहे. पण योग्य वेळी उपचार मिळाल्यास तो टाळता येतो. महिलांच्या गर्भाशयाच्या खालच्या भागात असलेल्या या पेशी गर्भाशय ग्रीवामध्ये वेगाने विकसित होतात.

काय आहे सर्व्हायकल कॅन्सरचे कारण?

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे मुख्य कारण ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. असे मानले जाते की ते असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरते. या आजारात गर्भाशय ग्रीवेच्या पेशी प्रभावित होतात. त्यामुळे गर्भाशय ग्रीवाच्या आतील ऊतींवर परिणाम होतो आणि नंतर तो शरीराच्या इतर भागातही पसरतो.

काय आहेत त्याची लक्षणे?

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला ओळखणे कठीण होऊ शकते. रोग जसजसा वाढत जातो तसतसे शरीरातील काही बदलांद्वारे ओळखले जाऊ शकते

- लघवीत रक्त येणे

- वारंवार लघवी होणे, लघवीच्या मार्गावरील नियंत्रण सुटणे.

- असामान्य ब्लीडिंग

- सेक्स दरम्यान तीव्र वेदना

- पाठदुखी किंवा ओटीपोटात दाब

- पोटात क्रॅम्प सारखी वेदना

- मासिक पाळी दरम्यान जास्त ब्लीडिंग.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel