Tricolor Makeup: यंदा भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. 26 जानेवारी (26 january) रोजी भारतातील प्रत्येक नागरिक देशभक्तीच्या रंगात रंगतो. या दिवशी शाळा, महाविद्यालये, सोसायटी आणि ऑफिसेस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी देशातील प्रत्येक नागरिक आपापल्या परीने देशाप्रती आपली भक्ती व्यक्त करताना दिसतो. कोणी डान्स करतो तर कोणी गाणं गातात. पण याशिवायही तुम्ही वेगळ्या पद्धतीने आपली देशभक्ती दाखवू शकता. प्रजासत्ताक दिनी तुम्ही मेकअपद्वारे देशभक्ती व्यक्त करू शकता. ट्राय कलर मेकअपबद्दल जाणून घ्या.
तिरंग्याच्या रंगांनी तुम्ही तुमचे डोळे सजवू शकता. यासाठी आयब्रो ब्रश घ्या आणि केशर, हिरवा आणि पांढरा आय शॅडो क्रमाने लावा. तुम्ही आयलायनरही लावू शकता.
ट्राय कलर नेल्स हा सगळ्यात सोप्पा मार्ग आहे. तुम्ही तुमच्या नखांना तिरंग्याचे तीनही रंग क्रमाने लावू शकता. हे खूप ट्रेंडी लुक देते.
तुम्ही तिरंग्याचा रंग ब्लश म्हणून वापरू शकता. बेसिक मेकअप करून तुम्ही तिरंग्याचे रंग दोन्ही गालावर लावा.
हा सगळ्यात कॉमन मार्ग आहे. पांढरा कुर्ता, केशरी ओढणी आणि हिरवी बॉटम घालू शकता, याशिवाय तुम्ही अशाच बांगड्याही घालू शकता. तुम्ही डोळ्यांच्या वर आणि खाली केशरी आणि हिरव्या रंगाचा मेकअप करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)