मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  On This Day: आजच्या दिवशी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांची झाली स्थापना, वाचा इतिहास

On This Day: आजच्या दिवशी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांची झाली स्थापना, वाचा इतिहास

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 21, 2023 08:51 AM IST

21 January History: आपला इतिहास खूप जुना आहे हे आपण प्रत्येक वेळी ऐकतो, परंतु आपल्याला आपल्या देशाच्या इतिहासाची पूर्ण माहिती नसते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आजच्या दिवसाची खास माहिती घेऊन आलो आहोत.

आजचा इतिहास
आजचा इतिहास (Freepik )

21 January Today Historical Events: इतिहास आपल्याला शिकवतोच, त्याचबरोबर भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्याची आणि कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याची संधी देतो. आज २१ जानेवारी आणि या दिवशी टेलीग्राफ पेटंट, टॉरपीडोने ऑईल विहीर खोदण्यात आली, कॉपीराइट कायदा काय आहे आणि तो भारतात कधी लागू झाला, यासोबतच या दिवशी इस्रोने काय कामगिरी केली, हे जाणून घ्या.

आजच्या महत्त्वाच्या घटना

> १९२४- ब्रिटनमध्ये प्रथमच मजूर पक्षाचे सरकार स्थापन झाले. पक्षाचे नेते राक्जे मॅकडोनाल्ड देशाचे पंतप्रधान झाले.

> १९२४ - बोल्शेविक क्रांतीचे नेतृत्व करणारे आणि १९१७ ते १९२४ या काळात सोव्हिएत युनियनचे पहिले नेते व्लादिमीर लेनिन यांचा मृत्यू.

> १९५०- क्षयरोगाशी तीन वर्षांच्या लढाईनंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जॉर्ज ऑरवेल यांचा मृत्यू.

> १९६३- हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार, संपादक आणि पत्रकार शिवपूजन सहाय यांचे निधन.

> १९७२- मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्याचा स्थापना दिवस.

> १९७६ - फ्रान्स आणि ब्रिटनच्या आर्थिक सहकार्याने तयार करण्यात आलेल्या कॉन्कॉर्ड या सुपरसॉनिक स्पीड व्यावसायिक विमानाने नियमित सेवा सुरू केली. यानंतर जगात हायस्पीड एअरक्राफ्ट बनवण्याची स्पर्धा लागली.

> १९९६ - पॅलेस्टिनी लिबरेशन ऑर्गनायझेशनचे नेते यासर अराफात, स्वायत्त पॅलेस्टाईनच्या पहिल्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीत ८५ टक्के मते मिळवून निवडून आले.

> १९९६- इंडोनेशियाच्या सुमात्रा किनाऱ्याजवळ प्रवाशांनी भरलेली बोट बुडाल्याने सुमारे ३४० लोक मरण पावले.

> २००८- भारताने इस्रायलचा गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला आणि ध्रुवीय कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केला.

> २००९ - कर्नाटकातील बीदर येथे सूर्यकिरण या हवाई दलाच्या प्रशिक्षण विमानाच्या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला.

(वरच्या लेखात काही निवडक घटना दिल्या आहेत. या खेरीज भारतीय इतिहासात आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या होत्या.)

WhatsApp channel

विभाग