Mumbai : ३२३ स्क्वेअर फूट जागेत बनवला २ बीएचके, बघा कांदिवली अपार्टमेंटचा viral video
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mumbai : ३२३ स्क्वेअर फूट जागेत बनवला २ बीएचके, बघा कांदिवली अपार्टमेंटचा viral video

Mumbai : ३२३ स्क्वेअर फूट जागेत बनवला २ बीएचके, बघा कांदिवली अपार्टमेंटचा viral video

Updated Feb 04, 2024 11:24 AM IST

Mumbai 2 BHK Flat Viral Video : एक इंफ्लूनसरने मुंबईतील कांदिवलीमध्ये २ बीएचके फ्लॅट घेऊ इच्छिणाऱ्या संभाव्य खरेदीदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Mumbai real estate viral video
Mumbai real estate viral video (X)

Mumbai Property Video:मुंबई हे एक असे ठिकाण आहे जिथे बरेच लोक जागेपेक्षा लोकशनला प्राधान्य देतात. हेच सांगणारा एक व्हिडीओ फार व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुंबईच्या कांदिवली ( Apartment at Kandivali )परिसरात एक कोटीपेक्षा कमी किमतीतील २ बीएचके फ्लॅट देण्याचा दावा केला आहे. नेटिझन्स किंमत आणि त्याचे कॉम्पॅक्ट डिझाइन केलेले इंटिरियर पाहून थक्क झाले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराचा आकार फक्त ३२३ चौरस फूट आहे आणि बिल्डर ते २ बीएचके म्हणून दिसण्यासाठी प्रत्येक छोट्या जागेचा वापर केला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका रिअल इस्टेट एजन्ट फारच उत्तमरीत्या सांगत आहे की व्हिडीओमध्ये दिसणारा फ्लॅट सुमारे ३२३ चौरस फूट आहे आणि त्याची किंमत ७५ लाख आहे. तिच्या रीलमध्ये, ही एजन्ट कांदिवलीमध्ये २ बीएचके फ्लॅट घेऊ इच्छिणाऱ्या संभाव्य खरेदीदारांचे लक्ष वेधून घेते आणि म्हणते की ते आता १ बीएचके फ्लॅटच्या अंदाजे बजेटसाठी ते घेऊ शकतात.

व्हिडीओमध्ये ती असं म्हणताना ऐकू येते, "तुम्ही २ बीएचके शोधत असाल परंतु तुमचे बजेट १ बीएचके खरेदी करण्यासारखे असेल, तर तुम्ही हा प्रकल्प खरेदी करू शकता जो २३ मजली इमारतीत आहे. हे कॉम्पॅक्ट २ बीएचके आहे. " ती व्हिडीओ बघणाऱ्याना घराचा व्हर्च्युअल दर्शन घडवते आणि सगळे वैशिष्ट्ये आणि सुविधा हायलाइट करते.

बघा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबईतील रिअल इस्टेटच्या प्रचंड ट्रेंडबद्दल लोकांना आश्चर्यचकित करत आहे. युजर कमेंट करत आहेत की "हे फक्त मुंबईतच शक्य आहे," असं एकाने कमेंट केलं. एका एक्स वापरकर्त्याने रील ऑनलाइन शेअर करताना सांगितले. शेकडो कमेंट्ससह एका दिवसापेक्षा कमी वेळात याला ९४,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Whats_app_banner