Zomato Share price : कंपनीच्या सीईओने एक ट्विट केलं काय आणि झोमॅटो शेअर राॅकेट्प्रमाणे भरभर वर चढला आहे. त्यात आज गुंतवणूकदारांनी सपाटून खरेदी के्याने ८.४ टक्के वाढीसह तो ५३.७५ रुपयांवर पोहोचला आहे. एकेकाळी त्यात तब्बल ५८ टक्क्यांची घट झाली होती.
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त खरेदी पहायला मिळाली. कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ८.४ टक्के वाढीसह तो ५३.७५ रुपयांवर पोहोचला. शेअर्समधील ही वाढ कंपनीचे सीईओ दिपंकर गोयल यांच्या एक ट्विटनंतर झाली आहे. वास्तविक गोयल यांनी फिनटेक कंपनी पेटीएमसंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यांनी पेटीएमच्या तिमाहीतील शानदार परफाॅर्मन्ससंदर्भात ट्विट केले आहे.
पेटीएम आणि त्यांचे संस्थापक विजय शेखऱ शर्मा यांना टॅग करण्यात आले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्राॅफिटेबल कंपनी बनवण्यासाठी विजयशेखर आणि पेटीएमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. क्षमा करा. पार्टीसाठी थोडा उशीर झाला. कारण स्वत: ची कंपनी प्राॅफिटेबल करण्यात मी व्यस्त होतो. दिपंकर यांनी मंगळवारी केलेल्या ट्विटनंतर बुधवारी झोमॅटोच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली.
पेटीएमच्या शेअर्समध्ये सतत तेजी
डिसेंबरच्या तिमाहीदरम्यान, पेटीएमचा महसूल तब्बल ४२ टक्के वाढून २०६२,२ कोटी रुपये झाला आहे. जो गत वर्षाच्या तुलनेत १४५६.१ कोटी रुपये होता. तर कंपनीचा तोटाही कमी झाला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचे कर्ज वितरणाचे प्रमाणही वाढले आहे. कंपनीने अंदाजे ९,९५८ कोटी रुपयांचे अंदाजे १०.५ लाख कर्ज वितरित केले आहेत. शेखर शर्मा यांनी शेअरधारकांना लिहिलेल्या पत्रात आम्ही नफ्यात असल्याचे सांगितले आहे.
संबंधित बातम्या