Share Market update : गुजरातच्या निकालानंतर शेअर बाजारात काय होणार? एक्सपर्ट म्हणतात…-will the stock market move depend on the election results of gujarat and himachal know what experts are saying ,latest news बातम्या
मराठी बातम्या  /  latest news  /  Share Market update : गुजरातच्या निकालानंतर शेअर बाजारात काय होणार? एक्सपर्ट म्हणतात…

Share Market update : गुजरातच्या निकालानंतर शेअर बाजारात काय होणार? एक्सपर्ट म्हणतात…

Dec 05, 2022 05:36 PM IST

Gujarat Election Result effect on Share Market update : तज्ज्ञांच्या मते, सध्या मुंबई शेअर निर्देशांकात मोठ्या प्रमाणात चढ उतार पहायला मिळत आहेत. मार्केटमध्ये सेंटिंमेट्स सकारात्मक आहेत. कारण गुंतवणूदार विधानसभा निवडणूकांच्या निकालांच्या प्रतिक्षेत आहेत.

Dalal Street HT
Dalal Street HT

Gujarat Election Result effect on Share Market update : तज्ज्ञांच्या मते, सध्या मुंबई शेअर निर्देशांकात मोठ्या प्रमाणात चढ उतार पहायला मिळत आहेत. मार्केटमध्ये सेंटिंमेट्स सकारात्मक आहेत. कारण गुंतवणूदार विधानसभा निवडणूकांच्या निकालांच्या प्रतिक्षेत आहेत. या निकालांच फलित चांगलं निघेल अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे. म्हणूनच सेन्सेक्समध्ये गेल्या आठवड्यात ०.९२ टक्के वाढ झाली.

भारतीय रिझर्व्ह बॅकेच्या व्याजदर वाढीच्या प्रभावानुसार चालू आठवड्यात निर्देशांकाची दिशा निश्चिंत होईल. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारपेठेतील स्थिती आणि परकीय गुंतवणूक यांवरही निर्देशांकातील चढ उतार ठरवेल. मात्र त्याचबरोबर शेअर बाजार विश्लेषकांची नजर राज्यांच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालांवर असणार आहेत.

स्वतिका इन्व्हेस्टमार्टचे शोध प्रमुख संतोष मीणा म्हणाले की, जागतिक बाजारपेठेतील स्थितीवर निर्देशांकातील चढ उतार ठरतील, दरम्यान, देशांतर्गत गुंतवणूकदारांचे लक्ष आरहबीआय पाॅलिसी आणि गुजरात - हिमाचल राज्यांतील विधानसभा निवडणूकीच्या निकालावर राहतील. विधानसभा निवडणूकीचे निकाल आठ डिसेंबरला आहेत.

जागतिक पातळीवर अमेरिकामध्ये बाँन्डमध्ये डाॅलर इंडेक्समध्ये घट झाली आहे. बाजाराची नजर त्यावर असणार आहे. त्याशिवाय आर्थिक पातळीवर सेवा क्षेत्रातील आकडेवारी (पीएमआय) सोमवारी जाहीर होणार आहे.

मोतीलाल ओसवाल कंपनीचे रिसर्च हेड सिद्धार्थ खेमका यांनीही गुंतवणूकदारांना या दोन्ही विधानसभा निवडणूकीच्या निकालांची प्रतिक्षा असल्याचे मान्य केले. गेल्या आठवड्यात सेंन्सेक्समध्ये अंदाजे ५७४.८६ अंशांची वाढ झाली आहे. या आठवड्यात रिझर्व्ह बॅकेच्या तिमाही पतधोरणावर निर्देशांकातील चढ उतार अवलंबून राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आजपासून सुरु झालेल्या नव्या आठवड्यात रिझर्व्ह बॅक तिमाही पतधोरण, विधानसभा निवडणूक निकाल यांसोबतच फेडरल रिझर्व्हची बैठक, चीनमध्ये कोविड १९ साठी घालण्यात आलेलेल निर्बंध, वाढती महागाई यावर निर्देशांकातील चढ उतार प्रामुख्याने अवलंबून असणार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या