Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
जोशी काकू त्यांच्या नातवाला घेऊन ट्रेननं चालल्या होत्या…
त्या सतत नातवाला त्यांच्याकडचा दुधीचा हलवा खायला सांगत होत्या आणि प्रत्येक वेळी म्हणत होत्या, नाही खाल्लास तर समोरच्या काकांना देऊन टाकेन.
नातू काही केल्या ऐकत नव्हता आणि जोशी काकूही पुन्हा तेच तेच सांगत होत्या…
शेवटी वैतागून समोरच्या बाकावर बसलेले काका म्हणाले,
अहो, वहिनी काय ते लवकर ठरवा. तुमच्या दुधीच्या हलव्याच्या आशेनं मी पाच स्टेशन पुढं आलोय…
…
काही लोक स्वत:च्या बायकोला ‘मॅडम’ म्हणून हाक मारतात…
आमच्या मॅडम अशा आहेत, आमच्या मॅडम तशा आहेत…
सतत हे ऐकून कळतच नाही की ह्या लोकांनी लग्न केलंय की शाळेत अॅडमिशन घेतलंय
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)