मराठी बातम्या  /  latest news  /  Pune Wagholi Murder : चिकन आणून दिलं नाही म्हणून डोक्यात दगड घालून शेजाऱ्याचा खून

Pune Wagholi Murder : चिकन आणून दिलं नाही म्हणून डोक्यात दगड घालून शेजाऱ्याचा खून

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 12, 2022 05:58 PM IST

Pune Wagholi Murder News: चिकन आणून न दिल्याच्या रागातून पुण्यातील वाघोली इथं एकानं शेजाऱ्याचा दगड डोक्यात घालून खून केल्याची घटना घडली आहे.

Crime News
Crime News (HT_PRINT)

Pune Wagholi Murder News: पुण्यात किरकोळ कारणावरून गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. वाघोली परिसरात शुक्रवारी अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका शेजऱ्याने चक्क चिकन न आणल्याने एकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर नायक (वय ३५, सध्या रा. रानवारा हॉटेलसमोर, वाडेबोल्हाई-केसनंद रस्ता, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी विकास भोसले, कविता भोसले, बल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायक यांची पत्नी मेहबू यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नायक आणि आरोपी भोसले दाम्पत्य शेजारी आहेत. शुक्रवारी नायक यांना आरोपींनी चिकन आणण्यास सांगितले. मात्र, नायक यांनी चिकन न आणल्याने भोसले हे नायकवर चिडले. यावेळी भोसले यांनी नायक यांची पत्नी मेहबू आणि मुलीला मारहाण करुन शिवीगाळ केली. भांडणात शंकर नायक यांनी मध्यस्थी केली. त्यावेळी आरेपी विकास भोसले आणि साथीदारांनी त्यांना जबर मारहाण केली. यावेळी आरोपीने नायक यांच्या डोक्यात दगड मारला. यात शंकर नायक हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारदारम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग